निवडणुकीसाठी राज्यात ९१५ शॅडो मतदान केंद्र

26 Oct 2024 19:45:59
- रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक २३२, सांगलीत केवळ १

मुंबई, 
Shadow Polling Station : आगामी विधानसभा निवडणूकांसाठी मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत राज्यात ९१५ शॅडो मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक २३२ आणि सांगलीत केवळ १ शॅडो मतदान केंद्र असणार आहे.
 
 
Shadow Polling Station
 
Shadow Polling Station : राज्यात एकूण २४ जिल्ह्यांमध्ये शॅडो मतदान केंद्र असतील. १२ जिल्ह्यांमध्ये शॅडो मतदान केंद्र नसतील. या शॅडो मतदान केंद्रात मतदानाच्या दिवशी विशेष सुविधा असणार आहेत. यात विशेष मेसेंजर, वॉकी-टॉकी, व्हीएचएफ, वायरलेस सेंटर, वायरलेस कम्युनिकेशन सेवा, सॅटेलाईट फोन, वने आणि पोलिस विभागाचा रनर तिथे कार्यरत असतील. याशिवाय बीएसएनएलमार्फत पर्यायी कम्युनिकेशन यंत्रणाही असेल.
कोणत्या जिल्ह्यात किती शॅडो मतदान केंद्रे
अमरावती- ७३, भंडारा- ०२, बुलढाणा- ०७, चंद्रपूर- ४१, गडचिरोली- ४९, गोंदिया- ३३, नागपूर- ०४, वर्धा- ०२, यवतमाळ-११.
Powered By Sangraha 9.0