३० तारखेला येणार काँग्रेसचा जाहीरनामा

27 Oct 2024 21:29:42
मुंबई, 
दिवाळीची शुभ भेट म्हणून राज्यातील जनतेसाठी उद्याच्या सरकारकडून जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत, त्यासाठी आमचा Congress manifesto जाहीरनामा तयार हा जाहिरनामा आम्ही ३० तारखेला प्रसिद्ध करणार आहोत, अशी माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. वडेट्टीवार मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, आमचा जाहीरनामा हा सर्वसमावेशक असणार आहे. शेतकर्‍यांपासून ते शेतमजुरापर्यंत सर्वांना न्याय देणारा जाहीरनामा असेल.
 
 
congress  m
 
Congress manifesto यावेळी त्यांनी मनसेवरही टीका केली. मनसेचा झेंडा नेहमी बदलत असतो. पूर्वी तो पंचरंगी होता, आता एकच रंग आहे. त्यामुळे मनसे नेहमी आपली भूमिका बदलत असते. त्यांचा झेंडा बदलला तर, भूमिका बदलते, असी टीका त्यांनी केली. लोकांना बनवाबनवी नको, गॅरंटी पाहिजे. ती गॅरंटी आम्ही तेलंगणा तसे कर्नाटकात पाळली आहे. महालक्ष्मी योजना अद्याप सुरू आहे. तिथे काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले, अशी त्यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0