आम्हाला आयात केलेला उमदेवार नको

27 Oct 2024 18:21:40
तभा वृत्तसेवा
राजुरा,
rajura vidhansabha राजुरा विधानसभा क्षेत्रासाठी स्थानिक उमदेवार न देता आयात केलेले देवराव भोंगळे यांना भाजपाने तिकीट दिले आहे. हे येथील स्थानिक कार्यकर्त्यांना अजिबात मान्य नाही. आता आम्ही पक्ष श्रेष्ठींपुढे गार्‍हाणे मांडणार आहोत. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव विधानसभा निवडणुकीत अर्ज दाखल करणार असून त्यानंतर पुढचा निर्णय घेऊ, असे माजी आमदार अ‍ॅड. संजय धोटे व माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी येथे पत्रपरिषदेत सांगितले.
 
 

rajura assembly 
 
 
rajura vidhansabha यावेळी अ‍ॅड. संजय धोटे, सुदर्शन निमकर, भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य खुशाल बोंडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आबीद अली, अरूण म्हस्की, सुरेश केंद्रे, निलेश ताजणे आदींसह अनेक भाजप पदाधिकारी उपस्थित होते. अ‍ॅड. धोटे म्हणाले, देवराव भोंगळे यांना केवळ लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पाठविले होते. मात्र त्यांनी येथे येऊन काही कार्यक्रम आयोजित करून दावेदारी केली. त्यांचा येथील कार्यकर्त्यांशी संपर्क नाही. वास्तविक ते आयात केलेले नेते असून, आम्हाला ते मान्य नाही, असेही ते म्हणाले. यावेळी राजुरा, कोरपना व जिवती तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0