गालावर खळी अन् राधा ही बावरी...

28 Oct 2024 17:24:04
- स्वप्निल बांदोडकरांच्या स्वरांनी दिल्लीकर मंत्रमुग्ध
- दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या दिवाळी पहाटचे नववे वर्ष

नवी दिल्ली, 
राजधानी दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमधील भव्य सेंट्रल पार्कमध्ये गायक Swapnil Bandodkar स्वप्निल बांदोडकर यांच्या स्वरांनी मंत्रमुग्ध होण्याचा अनुभव दिल्लीकर मराठीजनांनी घेतला. दिल्लीत यंदाही दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे हे नववे वर्ष होते. या वर्षी सुप्रसिद्ध मराठी गायक स्वप्निल बांदोडकर यांनी दिल्लीकरांना सुरेल मेजवानी दिली. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध निवेदिका आणि व्हॉईसओव्हर आर्टिस्ट मेघना एरंडे-जोशी, गायिका सावनी रवींद्र, ईशानी पाटणकर आणि स्वप्निल गोडबोले यांनीही दिल्लीकर मराठीजनांना सांस्कृतिक दिली.
 
 
diwali-pahat-1
 
पहाटे साडेपाच वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते, ते गायक Swapnil Bandodkar स्वप्निल बांदोडकर यांचे ‘राधा ही बावरी’ आणि ‘गालावर खळी’ ही गीते. ही गाणी सादर होत असताना उपस्थितांनाही स्वप्निल बांदोडकर यांना साथ देण्याचा मोह आवरला नाही. त्याचप्रमाणे सावनी रवींद्र यांच्या ‘गोर्‍या गोर्‍या गालावरी’ या गाण्याने उपस्थित दंग ईशानी पाटणकर यांचे ‘मला वेड लागले’ तर स्वप्निल गोडबोले यांचे ‘माय भवानी’ या गाण्याने उपस्थित भारावले. कार्यक्रमाचा शेवट ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने झाला.


diwali-pahat-2 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार
केंद्र सरकारतर्फे मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा देण्यात आला आहे. त्याविषयी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करणारे उपस्थित हजारो मराठीजनांच्या स्वाक्षरीने पाठवण्यात आले.
Powered By Sangraha 9.0