- झारखंड उत्पादन शुल्क घोटाळा
रांची,
ED raids : झारखंडमधील उत्पादन शुल्क ‘मनी लाँड्रिंग’ प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने आयएएस अधिकारी विनयकुमार चौबे, काही इतर सरकारी अधिकारी, मद्य व्यावसायिक आणि मध्यस्थांच्या ठिकाणांवर मंगळवारी छापेमारी केली. बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केल्यानंतर ईडीने रांची आणि रायपूर येथे १५ ठिकाणांवर छापेमारी केली. छापेमारीवेळी ईडीच्या पथकांना केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या सुरक्षा दिली.
या प्रकरणी छत्तीसगड पोलिसांच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाने ७ सप्टेंबर रोजी विनयकुमार चौबे, छत्तीसगडमधील सेवानिवृत्त आयएएस अधिकारी अनिल टुटेजा, रायपूरचे महापौर एजाझ ढेबर यांचे मोठे भाऊ अन्वर ढेबर, भारतीय टेलिकॉम सर्व्हिसचा अधिकारी अरुणपती त्रिपाठी, छत्तीसगड उत्पादन शुल्क विभागाचे विशेष सचिव आणि इतर चार जणांच्या विरोधात दाखल केलेल्या एफआयआरची दखल घेतली.
ED raids : सध्या झारखंड पंचायत राज विभगाचे सचिव असलेले विनयकुमार चौबे, राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाचे सहसचिव गजेंद्र सिंह आणि मद्य व्यावसायिक तसेच त्यांच्याशी संबंधित लोकांच्या ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली. झारखंडमध्ये २०२२ मध्ये हे उत्पादन शुल्क धोरण लागू केले, त्यावेळी चौबे हे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे प्रधान सचिव होते.