मणिपुरात यूएनएलएफच्या आठ बंडखोरांना अटक

29 Oct 2024 19:05:36
इम्फाळ,
प्रतिबंधित युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ मणिपूर (यूएनएलएफ पी) संघटनेच्या आठ Rebels arrested बंडखोरांना थौबल जिल्ह्यात पोलिसांनी अटक करीत ताब्यातून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. यूएनएलएफच्या बंडखोरांना लोकाना धमकावल्याबद्दल आणि जमीन सीमांकन प्रक्रिया रोखल्याच्या आरोपात अटक करण्यात आली.
 
 
arrested
 
Rebels arrested : त्यांच्या ताब्यातून तीन एके-४७ रायफली, दोन एके-५६ रायफली, एम-१६ रायफल, ९ मिमी व्यासाचे पिस्तूल, एके-४७ रायफलीची १४७ काडतुसे, एम-१६ रायफलीची २० काडतुसे, ९ मिमी पिस्तुलाची २५ काडतुसे, १६ मोबाईल आणि एक एसयूव्ही जप्त करण्यात आली. यूएनएलएफच्या पाम्बेई गटाने केंद्र सरकारसोबत २०२३ मध्ये संघर्षविरामाचा करार केला आहे. पश्चिम इम्फाळ जिल्ह्यातील लेईराक माचिन परिसरातून पोलिसांनी प्रतिबंधित पीपल्स लिबरेशन आर्मीच्या बंडखोराला सोमवारी अटक केली.
Powered By Sangraha 9.0