नागपूर,
जय माता दी ! जय माता दी ! आता अश्या घोषणा आपल्याला koradi mata mandir सगळीकडे ऐकायला मिळणार आहेत. आज घटस्थापना करून नवरात्राची सुरुवात झाली, या वेळी गरबा खेळण्यासाठी सगळे उत्साहात असतात. सगळीकडे गरबा खेळण्यासाठी पेंडाल, दांडिया, कपडे, लायटिंग, फुलांचे हार, मिठाईचे दुकान, पूजा साहित्याचे दुकान, इत्यादी पाहायला मिळते. संपूर्ण भारतातल्या मंदिरांना सजविण्यात आले आहे. नागुरात अनेक मंदिर असे आहे जे लोकप्रिय आहेत ज्यांचा इतिहास अद्वितीय आहे. असेच अद्वितीय आहे कोरडी माता मंदिर. चला तर मग जाणून घेऊयात.
आपल्या नागपूरची शान म्हणजे नाग नदी koradi mata mandir आणि संत्रा बर्फी हेच सर्वाना माहिती असेल. परंतु आता यात आणखी एक नाव जोडल्या गेले आहे, ज्याचं इतिहास अद्वितीय आहे, महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने पर्यटन स्थळांच्या यादीत समावेश केला आहे. कोराडी माता मंदिराच्या गाभाऱ्यात श्री महालक्ष्मी जगदम्बा माता विरागमन आहे. श्री महालक्ष्मी जगदंबा मातेची मूर्ती स्वयंभू आहे. या मंदिराची विशेषता म्हणजे श्री महालक्ष्मी जगदंबेच्या मूर्तीचे रूप दर तासाला बदलते. मूर्ती सकाळी लहान मुलीच्या रूपात, दुपारी तरुणीच्या रूपात आणि रात्री म्हातारीच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतो.
असा आहे इतिहास
या मंदिराचा इतिहास सुमारे ३०० वर्ष जुना koradi mata mandir आहे. पूर्वीच्या काळी कोराडी हे जाखापूर म्हणून ओळखले जायचे. जाखापूरचा राजा झोलन याला सात अपत्ये होते - जानोबा, नानोबा, बानोबा, बैरोबा, खैरोबा, अग्नोबा, दत्तसुर. राजाला मुलगी नसल्याने तो दु:खी होता. राजाने यज्ञ, हवन, पूजा, तपश्चर्या करून देवांना प्रसन्न केले आणि त्यांना कन्यादान करण्याची विनंती केली. राज्याला दैवी सौंदर्याची मुलगी जन्माला आली. आपल्या मुलीला पहिल्यांदा पाहिल्यानंतर राजाला असे वाटले की आदिशक्ती आपल्या कन्येच्या रूपात प्रकट झाली आहे. झोलनच्या राजाला त्याच्या मुलीच्या रूपात जन्मलेल्या दैवी शक्तीचे विविध अनुभव आले. देवी राज्याला योग्य मार्गदर्शन करत होती ज्यामुळे राज्याला निर्णय घेणे सोपे झाले होते. एकदा असे घडले, राजा युद्धाला गेला असता देवी सूक्ष्म देहाने त्याच्याबरोबर गेली. तिने केवळ राजा झोलनसाठीच नव्हे तर त्याच्या विरोधकांसाठीही निष्पक्षता सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. युद्धातून विजय मिळवून परत आल्यावर, त्याने सूर्यास्ताच्या वेळी थांबण्याचा निर्णय घेतला. हे पवित्र स्थान जाखापूर म्हणजेच आजचे 'कोराडी' म्हणून ओळखले जाऊ लागले. काही वर्षेनंतर तिथे एक मूर्ती सापडली. असे म्हंटले जाते की तिथे सापडलेली मूर्ती 'स्वयंभू' आहे.
मंदिराच्या बंधकांविषयी अनेक कथा आहेत
श्री महालक्ष्मी जगदंबा माता koradi mata mandir मंदिराशी संबंधित अनेक स्थानिक कथा आणि दंतकथा आहेत. पौराणिक कथेनुसार, नागपूरच्या राजघराण्याला देवी जगदंबा मातेला समर्पित मंदिर बांधायचे होते, परंतु त्यांना अनेक अडथळे येत होते.त्यांचे सर्वोतोपरी प्रयत्न करूनही मंदिराचे बांधकाम ठरल्याप्रमाणे होत नव्हते. एके दिवशी, एक संत राजघराण्याकडे गेले आणि घराण्यातील लोकांना देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी विशेष पूजा करण्याचा सल्ला दिला. राजघराण्याने संताच्या सल्ल्याचे पालन केले आणि चमत्कारिकरित्या मंदिराचे बांधकाम सुरळीतपणे सुरू झाले. असे मानले जाते की देवीच्या आशीर्वादाने बांधकामाचे काम सुरु झाले. मंदिराशी संबंधित आणखी एक कथा प्रचलित आहे, एकदा एक राक्षस अजिंक्य होता आणि कोणत्याही मानवाकडून त्याचा पराभव होणे शक्य न्हवते. तेव्हा जगदंबा मातेची आराधना करण्यात आली. मातेने नागपूरकरांचे रक्षण केले. देवीच्या भक्तांनी कोरडी मातेचे मंदिर बांधले.
सुरेख वास्तुकला
मंदिराचे स्थापत्य सौंदर्य koradi mata mandir वखडण्याजोगे आहे. परिसरात तलाव आणि गोमुख यांचा समावेश आहे. इथे थंड पाण्याचा नैसर्गिक प्रवाह असून या भागात आजही रांगोळीचे दगड सापडतात. कोराडी येथे माता श्री महालक्ष्मी जगदंबेचे मंदिर सुमारे दीडशे एकर परिसरात पसरले आहे. त्याची खासियत म्हणजे मातेचा दरबार चांदीचा आहे. चार वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याला भव्य स्वरूप देण्यात आले. राजस्थानातील ढोलपूर येथून आणलेल्या दगडांचा वापर करून ते पुन्हा बांधण्यात आले आहे. देवीच्या मंदिरात कमळाचे फूल अर्पण केले जाते.आई जगदंबेला कमळाचे फूल आवडते, म्हणूनच येथे येणारे भाविक कमळाचे फूल आणायला विसरत नाहीत.