- 30 जणांचे अवैध
चंद्रपूर,
Assembly Constituency : नामांकन अर्ज छाननीच्या दिवशी बुधवार, 30 ऑक्टोबरला जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील 120 उमेदवारांचे नामांकन वैध तर 30 जणांचे नामांकन अवैध ठरले. राजूरा विधानसभा मतदारसंघात 17 उमेदवारांचे अर्ज वैध तर 2 अवैध ठरले वैध नामांकनामध्ये सुभाष धोटे, वामन चटप, प्रिया खाडे, निनाद बोरकर, संजय धोटे, चित्रलेखा धंदरे, सुदर्शन निमकर, देवराव भोंगळे, सचिन भोयर, गजानन जुमनाके, प्रवीण कुमरे, रेश्मा चव्हाण, भुषण फुसे, प्रवीण सातपाडे, मंगेश गेडाम, किरण गेडाम, अभय डोंगरे, तर अवैध नामांकनामध्ये अरुण धोटे आणि वामन आत्राम यांचा समावेश आाहे.
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 17 उमेदवारांचे नामांकन अर्ज वैध तर 17 जणांचे अवैध ठरले. वैध नामांकनामध्ये सुरेश पाईकराव, नभा वाघमारे, राजेश घुटके, किशोर जोरगेवार, प्रियदर्शन इंगळे, प्रवीण पडवेकर, मिलिंद दहिवले, ज्ञानेश्वर नगराळे, भानेश मातंगी, विनोद खोब्रागडे, प्रकाश रामटेके, मनोज लाडे, प्रकाश ताकसांडे, ब्रिजभूषण पाझारे, राजू झोडे, आनंद इंगळे, रतन गायकवाड, तर अवैध नामांकनामध्ये भुवनेश्वर निमगडे, कोमल जोरगेवार, मोरेश्वर बडोले, विशाल रंगारी, अरुण कांबळे, बबन कासवटे, आशिष माशीरकर, स्नेहल रामटेके, संजय गावंडे, ज्ञानदेव हुमणे, देवानंद लांडगे, भीमनवार परशुराम, राहुल घोटेकर, प्रवर्तन आवळे, महेश मेंढे, प्रतीक डोरलीकर, अशोक मस्के यांचा समावेश आहे.
Assembly Constituency : बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 27 उमेदवारांचे अर्ज वैध, तर एकाही उमेदवाराचे नामांकान अवैध ठरले नाही. वैध नामांकनामध्ये संतोषसिंह रावत, (इंडियन नॅशनल काँग्रेस), किशोर उइके (अपक्ष), संजय गावंडे (अपक्ष), रामराव चव्हाण (अपक्ष), निशा धोंगडे (अपक्ष), राजु जांभुळे (अपक्ष), सतीश मालेकर (वंचित बहुजन आघाडी), कुणाल गायकवाड (अपक्ष), सुधीर मुनगंटीवार (भाजपा), अरूण कांबळे (रिपब्लीकन पार्टी इंडिया (रिफॉरमिस्ट), अभिलाषा गावतुरे (अपक्ष), प्रकाश पाटील (अपक्ष), रब्बानी याकुब सय्यद (अपक्ष), उमेश शेंडे (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमाक्रेटीक), मनोज आत्राम (गोंडवाना गणतंत्र पार्टी), संजय घाटे (अपक्ष), सत्यपाल कातकर (रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (ए)), छाया गावतुरे (अपक्ष), अनीता गावतुरे (अपक्ष), नरेन्द्र सोनारकर (बहुजन समाज पार्टी), सचिन रावत (अपक्ष), राकेश गावतुरे (अपक्ष), भारत थुलकर (ऑल इंडीयन रिपब्लीकन पार्टी), संजय कन्नावार (राष्ट्रीय समाज पक्ष), सैय्यद अफजल अली सैय्यद आबिद अली (अपक्ष), संदीप गिर्हे (अपक्ष), विरेंद्र कांबळे (अपक्ष) यांचा समावेश आहे.
ब्रम्हपुरी मतदारसंघात 17 उमेदवारांचे अर्ज वैध तर 2 अवैध ठरले आहे. वैध नामांकनामध्ये विजय वडेट्टीवार (इंडियन नॅशनल काँग्रेस), कृष्णालाल साहारे (भाजपा), केवळराम पारधी (बसपा), सुधीर टोंगे (राष्ट्रवादी समाज पार्टी), गोपाळ मेंढे (बीआरएसपी), विनोद नावघडे (अपक्ष), वसंत वारजूकर (अपक्ष), गुरुदेव भोपये (अपक्ष), सुधाकर श्रीराम (अपक्ष), अनंता भोयर (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया), चक्रधर मेश्राम (जन जनवादी पक्ष), प्रशांत डांगे (आरपी रिपा), रमेश मडावी (अपक्ष), नारायण जांभुळे( स्वाभिमानी पक्ष), राहुल मेश्राम( वंचित बहुजन आघाडी), रमेश समर्थ (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया- ए), प्रेमलाळ मेश्राम (अपक्ष), तर अवैध नामांकनामध्ये चक्रधर जांभुले (कृतीशील गणराज्य पक्ष) आणि पराग सहारे (अपक्ष) यांचा समावेश आहे.
चिमूर मतदारसंघात 18 उमेदवारांचे अर्ज वैध तर 4 अवैध ठरले. वैध नामांकनामध्ये सतिश वारजुकर (काँग्रेस), किर्तीकुमार भांगडीया (भाजपा), अरविंद सांदेकर (वंचित बहुजन आघाडी), डॉ. प्रकाश नान्हे (पिझन्टस अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया), निकेश रामटेके (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), अमित भिमटे (आझाद समाज पार्टी), नारायण जांभुळे (स्वाभीमानी पक्ष), अरविंद सांदेकर (अपक्ष), अनिल धोंगडे (अपक्ष), हेमंत दांडेकर (अपक्ष), धनराज मुंगले (अपक्ष), कैलास बोरकर (अपक्ष), योगेश गोन्नाडे (अपक्ष), अॅङ. हेमंत उरकुडे (अपक्ष), मनोज मडावी (अपक्ष), रमेश पचारे (अपक्ष), जितेंद्र ठोंबरे (अपक्ष), केशव रामटेके (अपक्ष) यांचा, तर अवैध नामांकनामध्ये धनराज मुंगले (काँग्रेस), भाऊराव दांडेकर (काँग्रेस), राजेंद्र रामटेके (बहुजन समाज पार्टी), अॅड. हेमंत उरकुडे (अपक्ष) यांचा समावेश आहे.
Assembly Constituency : वरोडा मतदारसंघात 24 उमेदवारांचे अर्ज वैध तर 5 अवैध ठरले आहे. वैध नामांकनामध्ये प्रवीण काकडे (इंडियन नॅशनल काँग्रेस), विनोद खोब्रागडे (अपक्ष), अमोल बावणे (अपक्ष), राजू गायकवाड (अपक्ष), जयवंत काकडे (बीआरएसपी ), जयंत टेमुर्डे ( अपक्ष), अहेतेश्याम अली (प्रहार जनशक्ती), श्रीकृष्ण दडमल (अपक्ष), रंजना पारशिवे (अपक्ष), करण देवतळे (भाजपा), मुकेश जीवतोडे (अपक्ष), चेतन खुटेमाटे (अपक्ष), महेश ठेंगणे (अपक्ष), मुनेश्वर बदखल (अपक्ष), रमेश राजुरकर (अपक्ष), प्रवीण सुर (मनसे), प्रवीण खैरे (अपक्ष), नरेंद्र जीवतोडे (अपक्ष), सुभाष ठेंगणे (अपक्ष), अतुल वानकर (अपक्ष), अनिल धानोरकर (वंचित बहुजन आघाडी), सागर वरघणे (बहुजन समाज पक्ष), तारा काळे (अपक्ष), सेवकदास बरके (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक) यांचा समावेश आहे. तर, अवैध नामांकनामध्ये दिनेश चोखारे (इंडियन नॅशनल काँग्रेस व अपक्ष), रमेश मेश्राम (गोंडवाना गणतंत्र पार्टी व अपक्ष), नामदेव ढुमणे (अपक्ष), अंबर खानेकर (राष्ट्रीय समाज पक्ष), सुमितकुमार चंद्रागडे (अपक्ष) यांचा समावेश आहे.