देसाईगंज,
Experienced and skilled candidates भारत देश हा एक लोकशाही देश आहे. विधानसभा व लोकसभा हे दोन्ही सभागृहे कायदे तयार करणारे व त्याची प्रभावी अंमलबजावणी होते की नाही हे पहाणारे सभागृह आहेत. या सभागृहात बसणारा प्रत्येक सदस्य हा विश्वसनीय, कार्यकुशल, लोकसमेस्येची जाण असणारा, बहुतेक भाषांवर प्रभुत्व असणारा, कायद्याची जाण असणारा, विकासाप्रती तळमळ असणारा, समाजाभिमुख आणि जातियता न मानणारा असावा लागतो. मात्र प्रस्थापित राजकीय पक्षांना विविध क्षेत्रात निपुण असणारे उमेदवार चालत नाही. त्यांची मर्जी सांभाळणारे आणि फक्त होयबाची भुमिका ठेवणारे उमेदवार चालतात. अशाच उमेदवारांना तिकेटे देवून स्वतःची पकड मजबूत करतात.
Experienced and skilled candidates त्यामुळे अशा आपलपोट्या नेत्यांमुळे लोकशाही धोक्यात आली असून संधीसाधू प्रवृत्तींच्या नेत्यांपासून लोकांनी सावध राहण्याची गरज असल्याचा आरोप आरमोरी विधानसभा क्षेत्रातून कॉग्रेसने तिकीट नाकारलेल्या माजी उपायुक्त माधुरी मडावी यांनी काल मंगळवारी पत्रपरिषदेतून केला आहे. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अशोक माडावार, जमाल शेख आणि इंजि. सुनिल आमटे उपस्थित होते. यावेळी माधूरी मडावी यांनी म्हटले की, विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या दोन्ही नेत्यांच्या मी तीन वर्षापासून संपर्कात होतो. या दोन्ही नेत्यांसहीत केंद्रीय नेतृत्वाच्या देखील मी गेल्या दोन-तीन वर्षांपासून संपर्कात होते.
Experienced and skilled candidates दोघांनीही निवडणूकीची तयारी करण्यास सांगितले. विजय वडेट्टीवार यांनी तर यंदाच्या निवडणुकीत पक्षाला महिला चेहर्याची गरज असून उच्च शिक्षित, राजकीय, सामाजिक आणि प्रशासनाचा प्रदिर्घ अनुभव असणारी महिला उमेदवार पाहिजे असल्याचे स्वतः फोन करून सांगितले. याशिवाय मला 100 टक्के उमेदवारी मिळवून देण्याचे वचन दिले होते. मात्र शेवटी त्यांनी माझा विश्वासघात केला. आदिवासी आमदार असून आदिवासींच्या विकासासाठी येथे काहीच केले नाही. याशिवाय अन्य घटकांसाठी देखील काहीही केले नाही. केवळ मोजके भांडवलदार, व्यापारी आणि ठेकेदार यांचे बटीक म्हणून राहण्यातच धन्य मानून स्वस्वार्थ साधला. या सर्वांवर मात करण्यासाठी आणि जनतेला न्याय देण्यासाठी काँग्रेसने तिकीट नाकारले असले तरी जनतेच्या प्रेमापोटी अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचेही मडावी यांनी म्हटले.