विद्यापीठाच्या विविध क्रीडा स्पर्धांसाठी संघाची घोषणा

    दिनांक :30-Oct-2024
Total Views |
नागपूर,
RTMN University :  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या टेनिस (महिला व पुरुष) संघाची घोषणा क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ प्रभारी संचालक डॉ. विशाखा जोशी यांनी केली.
 

jjhjkkkjj
 
 
महिला संघ :
 
स्व. बी. एन. शारीरिक शिक्षण महाविद्यालय नागपूरची भूमिका दहिया, तायवाडे महाविद्यालय कोराडी येथील कल्याणी सोमेवार, रामदेव बाबा अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथील राधा गिरडकर व मृण्मयी कुऱ्हाडे तर राखीव खेळाडू म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय नागपूर येथील आस्था कुमार यांचा समावेश आहे.
 
पुरुष संघ :
 
धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर येथील राज बागडी, डॉ. एम. वासनिक पीडब्ल्यूएस महाविद्यालय नागपूर येथील हर्षल पाटील, गुरु नानक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर येथील तेजस पाल, तिरपुडे महाविद्यालय येथील तरुण फुले, रामदेव बाबा अभियांत्रिकी महाविद्यालय येथील आनंद मराठे तर राखीव खेळाडू म्हणून इंदिरा गांधी महाविद्यालयातील मनीष बिंझाडे यांचा समावेश आहे.
 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पुरुष बास्केटबॉल संघ क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ प्रभारी संचालक डॉ. विशाखा जोशी यांनी घोषित केला.
 
संघामध्ये धनवटे नॅशनल कॉलेज येथील सिद्धेश कुलकर्णी, हिमांशू शेंडे, शुभम राऊत, इलाईट कॉलेज सावनेर येथील राजेश्वर परदेशी, पियुष पिढेकर, जी. एच. अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथील तारण कक्कड, सिद्धेश बुराडे, हिस्लॉप महाविद्यालयातील प्रथम गुप्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय नागपूर येथील सार्थक धुलधुळे, ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील तन्मय चौधरी, नागपूर शारीरिक शिक्षण महाविद्यालय नागपूर RTMN University येथील शाम खेडेकर, रामदेव बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील पार्थ बोरकुटे तर राखीव खेळाडूंमध्ये जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील वल्लभ त्रिवेदी, हिस्लाॅप महाविद्यालयातील रवी चौधरी, यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातील वंशवर्धन सोरटे, सेंट वीसेंट अभियांत्रिकी महाविद्यालय परीक्षीत दातीर, धनवटे नॅशनल कॉलेजचा सारंग उमाटे तर कला व वाणिज्य विज्ञान महाविद्यालय वर्धा येथील आदर्श मोहर्ले यांचा समावेश आहे.
 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पुरुष कराटे संघाची घोषणा क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ प्रभारी संचालक डॉ. विशाखा जोशी यांनी केली आहे.
 
कराटे (पुरुष) वैयक्तिक कुमिते
 
या प्रकारात रामकृष्ण वाघ महाविद्यालय बोखारा येथील आर्यन खोब्रागडे (५० किलो वजन गट), चिंतामणी शारीरिक शिक्षण महाविद्यालय वर्धा येथील वैभव साखरकर (५५ किलो वजन गट), यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूरचा आर्यन गायधने (६० किलो वजन गट), श्री माथूरदास मोहता विज्ञान महाविद्यालय नागपूरचा मोहनीश बोरकर (६७ किलो वजन गट), धनवटे नॅशनल कॉलेजचा ऋतिक मुदलीयार (७५ किलो वजन गट), नागपूर RTMN University शारीरिक शिक्षण महाविद्यालय नागपूर येथील मृत्यूंजयसिंग एन. खांडीय (८४ किलो वजन गट), जी. एच. अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथील मानव इंगळे (८४ किलो पेक्षा जास्त वजन गट) तर राखीव खेळाडूंमध्ये ओसिस महाविद्यालय बेला भंडारा येथील बादल धांडे (५० किलो वजन गट), प्रेरणा महाविद्यालय नागपूर येथील सौम्य रेवते (५५ किलो वजन गट), सिटी प्रीमियर महाविद्यालयाचा साहिलसिंग पवार (६० किलो वजन गट), के. डी. पवार शारीरिक शिक्षण महाविद्यालय सावनेर येथील दर्शन लोणारे (६७ किलो वजन गट), तुळशीराम गायकवाड शारीरिक शिक्षण महाविद्यालय नागपूर येथील प्रसन्न पुस्बी (७५ किलो वजन गट), डी. आर. बी. सिंधू महाविद्यालय नागपूर येथील लोकेश विश्वकाशी यांचा समावेश आहे.
 
कराटे पुरुष संघ कुमिते
 
साकेत शारीरिक शिक्षण महाविद्यालय गोंदिया येथील हर्ष, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तन्मय मेटांगळे, श्री क्रिनदास महाविद्यालय वर्धा येथील सुजल रंगारी, जीएचआरसीई नागपूर RTMN University येथील ओम पेशाने, जे. व्ही. एम. देवग्राम येथील अविनाश मानेकर, के. आर. पांडव महाविद्यालय नागपूर येथील अमीर मलधारी, सिटी प्रीमियर कॉलेज नागपूर येथील साहिलसिंग पवार तर राखीव खेळाडू म्हणून प्रेरणा महाविद्यालय नागपूर येथील भूमन रेवते, झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर येथील तेजस गोंडसे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय येथील मीत मिश्रा, के. आर. पांडव महाविद्यालय नागपूर येथील अमीर मलधारी, के. डी. पवार शारीरिक शिक्षण महाविद्यालय सावनेर येथील दर्शन लोणारे, जी.एस. वाणिज्य महाविद्यालय नागपूर येथील अनिरुद्ध मोरे व विपुल पटेल यांचा समावेश आहे.
 
पुरुष काता वैयक्तिक
 
जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथील मानस राऊत तर राखीव मध्ये ज्योतिबा फुले शारीरिक शिक्षण महाविद्यालय नागपूर येथील भूषण भक्ते, संताजी महाविद्यालय नागपूर येथील उदय लेंडे व जवाहरलाल नेहरू महाविद्यालय वाडी येथील प्रांजल मांडवगडे यांचा समावेश आहे.
 
पुरुष संघ (काता)
 
झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर येथील मनीष नार्वेकर, जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथील मानस राऊत व कौस्तुभ बिसने तर आरक्षित खेळाडू म्हणून रामकृष्ण वाघ महाविद्यालय बोखरा येथील आर्यन खोब्रागडे यांचा समावेश आहे.