लोहपुरुषाची आठवण जागवणारा ‘राष्ट्रीय एकता दिवस’

30 Oct 2024 21:46:05
नागपूर, 
देशाला स्वातंत्र्यासाठी लढणारे अनेक नेते होते. मात्र, देशाला मिळाल्यानंतर आणि सत्तेत आल्यानंतरही ज्यांनी लोकहिताचा विचार केला त्यात Sardar Vallabhbhai Patel सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव प्रमुख्याने येते. राष्ट्रीय एकता दिवस हा ३१ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी, स्वातंत्र्यसैनिक, वकील आणि राजकारणी सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘एकता दिन’ हा उत्सव म्हणून साजरा करतात. सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतर एकत्रीकरण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे आज आपल्याला एकसंघ भारत बघायला मिळतो आहे. त्यांच्या प्रयत्नांचे स्मरण करण्यासाठी राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो. या दिवशी देशभरात विविध सांस्कृतिक कार्यक‘म तसेच चर्चासत्र आयोजित केली जातात.
 
 
Patel
 
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त दरवर्षी भारत सरकारकडून एक संकल्पना निश्चित केली जाते. जी नागरिकांमध्ये एकता अखंडता वाढवण्याच्या दिशेने सरकारच्या पुढाकारांशी निगडित असते. यावर्षी रायगड किल्ल्याची थीम आयोजित करण्यात आली आहे. रायगड किल्ला हा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे असामान्य शौर्य आणि अभिनव युद्धतंत्र दाखवण्यासाठी गुजरातच्या केवडियातील राष्ट्रीय एकता दिन परेडच्या ठिकाणी रायगड किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. ‘किल्ल्यांचा राजा’ म्हणून ओळखला जाणारा किल्ला हा महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेची आठवण करून देणारा आहे. जगभरातील लोकांसाठी हे एक पवित्र स्थळ आहे. त्यामुळे हजारो लोक येथे येतात.
 
 
Sardar Vallabhbhai Patel : राष्ट्रीय एकता दिवस साजरा करणे २०१४ पासून सुरू झाले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्याचा पुढाकार भारत सरकारने घेतला. सरदार वल्लभभाई पटेल हे भारतीय एकात्मतेचे मानले जातात, कारण स्वातंत्र्यानंतर ५६२ हून अधिक संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या योगदानामुळे त्यांना भारताचे ‘लोहपुरुष’ म्हटले जाते. त्यांची दूरदृष्टी भारताची एकता आणि अखंडता राखण्यासाठी आजही उपयुक्त आहे.
Powered By Sangraha 9.0