वर्धा जिल्ह्यात अपक्षांचीच चर्चा

30 Oct 2024 21:12:33
वर्धा, 
Wardha Assembly Constituency वर्धा जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात बंडखोर व अपक्ष डोकेदुखी ठरत आहेत. विशेष म्हणजे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांपेक्षा अपक्षांचीच चर्चा जोरात आहे. वर्धा जिल्ह्यातील वर्धा, आर्वी आणि हिंगणघाट या तीन मतदार संघात महायुती, महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांशिवाय अपक्ष उमेदवारांभोवतीच वादळ फिरत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या 4 नोव्हेंबरपर्यंत काहींना उमेदवारी मागे घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होतील आणि सुरू झाले आहेत. 2009 मध्ये वर्धा विभानसभेतून प्रा. सुरेश देशमुख अपक्ष निवडून आले. 2014 मध्ये भाजपच्या उमेदवारीवर डॉ. पंकज भोयर यांनी विजय मिळविली. 2019 या विजयाची पुनर्रावृत्ती केली. 2014 मध्ये हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे अशोक शिंदे विजयी झाले. 2014 मध्ये भाजपच्या उमेदवारीवर समीर कुणावार यांनी विजय मिळवला.
 
 
wardha
 
Wardha Assembly Constituency 2019 मध्ये तेच पुन्हा निवडून आले. आर्वी मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीवर दादाराव केचे यांनी विजय मिळविला. 2014 मध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवर अमर काळे विजयी झाले. 2019 मध्ये दादाराव केचे यांचा विजय झाला. देवळी मतदारसंघात 2009 पासून काँग्रेसचे रणजित कांबळे विजयी होत आले. वर्धा विधानसभा मतदारसंघात यावेळी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह बंडखोर आणि इतर अपक्ष उमेदवारांचा भरणा आहे. 2 निवडणुकीत विजयी झालेले आ. डॉ. पंकज भोयर, सलग चौथ्यांदा उमेदवारी मिळालेले माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे यांच्यासह अपक्ष म्हणून डॉ. सचिन पावडे, डॉ. सुधीर पांगूळ, राकाँ शरद पवार पक्षाचे समीर देशमुख यांनी नामांकन अर्ज दाखल केला आहे. हिंगणघाट मतदारसंघात आ. समीर कुणावार तिसर्‍यांदा मैदानात आहेत. राकाँ शरद पवार पक्षाने अतुल वांदिले यांना उमेदवारी दिली. त्यानंतर अ‍ॅड. सुधीर कोठारी, राजू तिमांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर आर्वी विधानसभा मतदार संघात भाजपात बंडखोरी झाली. अधिकृत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच दादाराव केचे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून सुमित वानखेडे यांची घोषणा झाली. केचे अपक्ष असल्याने भाजपासाठी डोकेदुखी वाढली आहे. समाजमाध्यमावर जुगलबंदी रंगली आहे. देवळीत मात्र भाजपाचे राजेश बकाने विरुद्ध आ. रणजित कांबळे अशी थेट लढत होईल.
 
Powered By Sangraha 9.0