बंगालमध्ये दिवाळीला काली मातेची पूजा का केली जाते?

30 Oct 2024 16:32:16
west bengal puja दिवाळीच्या दिवशी, जिथे देशभरात देवी लक्ष्मी आणि गणेशजींची पूजा केली जाते. परंतु, बंगालमधील लोक या दिवशी माता कालीची पूजा करतात. बंगालमध्ये असे का घडते? हे तुम्हाला माहीत आहे का? देशभरात दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो. प्रत्येक राज्यात दिवाळीची पूजाही वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. पण या दिवशी बंगालमध्ये माता कालीची पूजा केली जाते. येथे दिवाळीला कालीपूजा म्हणून ओळखले जाते. बंगालमध्ये या दिवसाला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, या दिवाळीला मध्यरात्री माता कालीची पूजा केल्याने माणसाच्या जीवनातील सर्व दुःख आणि संकटे दूर होतात. याशिवाय शत्रूंचा नाश होतो व जीवनात सुख-समृद्धीही येते.
 
 
maa kali
 
 
बंगालमध्ये काली पूजा का केली जाते?
बंगालमध्ये दिवाळीच्या west bengal puja दिवशी काली मातेची पूजा करण्याविषयी एक पौराणिक कथा प्रचलित आहे. त्यानुसार, एकेकाळी चंड-मुंड आणि शुंभ-निशुंभ इत्यादी राक्षसांचे अत्याचार खूप वाढले होते. त्यानंतर, त्याने इंद्रलोकही काबीज करण्यासाठी देवांशी युद्ध सुरू केले. तेव्हा सर्व देवांनी भगवान शंकराकडे जाऊन राक्षसांपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना केली. भगवान शिवाने अंबा हे माता पार्वतीचे रूप प्रकट केले. या राक्षसांना मारण्यासाठी माता अंबाने माता कालीचे भयंकर रूप धारण केले आणि अत्याचार करणाऱ्या सर्व राक्षसांना मारले. त्यानंतर, रक्तबीज हा अत्यंत शक्तिशाली राक्षस तेथे आला.
रक्तबीज हा राक्षस होता ज्याच्या रक्ताचा एक थेंब जमिनीवर पडताच त्या रक्तापासून एक नवीन राक्षस निर्माण झाला. म्हणूनच, त्याला रक्तबीज असे म्हणतात. रक्त बीजाला मारण्यासाठी आणि दुसऱ्या रक्त बीजाचा जन्म रोखण्यासाठी, माता कालीने आपली जीभ बाहेर काढली. व रक्त बीजावर तलवारीने हल्ला केला आणि ते जमिनीवर पडण्यापूर्वी त्याचे रक्त पिऊ लागली. अशा रीतीने रक्तबीज मारल्या गेला. पण माता कालीचा राग शांत झाला नाही. तिचा विनाशाकडे कल होता. माता कालीचे हे रूप पाहून असे वाटले की, आता ती संपूर्ण सृष्टीचा नाश करेल. भगवान शंकरांना हे समजताच ते शांतपणे माता कालीच्या मार्गात आडवे झाले.
माँ काली ही भगवान west bengal puja शिवाचा अंश आहे. म्हणूनच, तिला अर्धनारीश्वर असेही म्हणतात.त्यांना अनंत शिव देखील म्हटले जाते. कारण कोणीही त्यांना ओळखू शकत नाही. जेव्हा माता काली पुढे सरकली तेव्हा तिचा पाय भगवान शिवाच्या छातीवर पडला. अनंत शिवाच्या छातीला तिच्या पायांचा स्पर्श होताच, माता कालीला धक्का बसला कारण तिने पाहिले की ते भगवान शिव आहेत. तिचा राग ताबडतोब संपला व तिने जगातील सर्व जीवांना आशीर्वाद दिले. त्यामुळे, कार्तिक महिन्यातील अमावास्येला माता कालीची पूजा केली जाते.

माँ काली पूजेची पद्धत
देवी कालीची पूजा west bengal puja करण्यासाठी सकाळी स्नान करून व्रताची प्रतिज्ञा घ्यावी. पूजेच्या ठिकाणी काली देवीची मूर्ती किंवा चित्र ठेवा. लाल किंवा काळ्या कपड्याने सजवा. माँ कालीला आवाहन द्या आणि तिला पूजेसाठी आमंत्रित करा. देवीच्या मूर्तीला सिंदूर, हळद, कुंकू, काजळ अर्पण करा. माँ कालीला फुलांचा हार. मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि कापरानी आरती करा.माँ कालीला मिठाई, फळे व नैवेद्य अर्पण करा. हा मंत्र माता कालीला अतिशय प्रिय आहे. यानंतर माँ कालीची आरती करून पूजा पूर्ण करा.
Powered By Sangraha 9.0