भारतीय कुटुंबे विश्वकल्याणाचा आधार

31 Oct 2024 05:55:00
संस्कृती
- हितेश शंकर
Indian families ; मनुष्य त्याच्या उत्क्रांतीच्या, विकासाच्या प्रवासात नेहमीच मध्यभागी असतो. म्हणजेच ही एक प्रवाही प्रक्रिया आहे ज्यामध्ये देश, काळ आणि परिस्थितीनुसार अनेक गोष्टी बदलत राहतात. या परिवर्तनीय प्रवासाचा मार्ग रेषीय असू शकतो आणि वर्तुळाकार देखील असू शकतो. रेषीय (रेखीय) म्हणजे सरळ पुढे सरकणे आणि वर्तुळाकार म्हणजे आपण सुरुवात केली होती त्याच बिंदूवर परत येणे. काही संदर्भांमध्ये आमचा प्रवास रेषीय असू शकतो, तर काहींमध्ये वर्तुळाकार. ज्ञान, संस्कृती आणि अनुभव यांची त्रिवेणी आम्हाला कोणत्या संगमाकडे घेऊन जाते यावर ते अवलंबून आहे. कुटुंब व्यवस्था हा आमच्या जीवन पद्धतीचा आधार राहिला आहे आणि काळानुरूप त्यात अनेक बदल देखील झाले आहेत. निकषांवर कुटुंबांकडे सूक्ष्म दृष्टीने, बारकाईने पाहणे आवश्यक आहे कारण ‘जसे कुटुंब तसा समाज आणि जसा समाज तसा देश’ हे अगदी स्पष्ट आहे.
 
 
Parivar-1
 
कुटुंबव्यवस्थेत येणारे अथवा होणारे बदल किती नैसर्गिक आहेत आणि किती लादलेले किंवा थोपवलेले आहेत आहे, हे पाहावे लागेल. जर ते नैसर्गिक असतील तर त्याचे भविष्य कसे राहील जर लादलेले असतील तर त्यामागील कारक (घटक) कोणते आहेत आणि भविष्यात ते कोणत्या स्वरूपात आणि परिणाम घेऊन पुढे येऊ शकतात, याचा प्रकर्षाने विचार केला पाहिजे. व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षा, इच्छा, आकांक्षा, भव्य स्वप्ने, सर्वत्र असणारी स्पर्धा यामुळे घरांच्या चार भिंती केव्हाच ओलांडल्या गेल्या आहेत. अनेक शहरे आणि महानगरे संधींची, उद्योग-व्यवसायांची केंद्रे आहेत. या महानगरीय चक्रव्यूहात, कबुतरखान्यात सर्वसामान्य लोक शांतीचा मार्ग शोधत आहेत, यात शंकाच नाही. भौतिक विकासाच्या, आर्थिक प्रगतीच्या दिशेने घोडदौड करणार्‍या माणसाला शांती, समाधान व आनंद हवा आहे. मात्र, सर्वत्र स्पर्धेच्या या युगात सामाजिक एकोप्याचे धागे कमकुवत होत आहेत. जीवनाच्या स्पर्धेत मागे राहिलेल्या आपल्या मित्र-नातेवाईकांचा हात धरून त्यांनाही आणावे, असे स्वत:ची आर्थिक, भौतिक प्रगती केलेल्यांना वाटत नाही. सर्वत्र व्यक्तिगत स्वार्थ व स्वकेंद्रित भावना वाढीस लागली आहे. या संकुचित व आत्मकेंद्रित वृत्तीमुळेच सर्वत्र अशांती व असमाधान वाढीस लागत आहे. हे सर्व आपण आपल्या आजूबाजूला पाहत असतो.
 
 
Indian families : भारतात कुटुंब हे केवळ एक सामाजिक घटक नाही, तर ती एक अशी आहे जिथे जीवनाचे सर्व रंग समाविष्ट आहेत. कुटुंब आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूला दिशा देतात आणि समाज, राष्ट्र आणि विश्वाच्या कल्याणाचे केंद्र बनतात. भारतीय संस्कृतीत कुटुंबांचे महत्त्व इतके आहे की ती जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राचा आधार मानली जातात. भारतीय दृष्टिकोनातून कुटुंब ही केवळ नातेसंबंधांपुरतेच मर्यादित नसून ती प्रेम, सहकार्य आणि नैतिकतेने असलेली भावना आहे. कुटुंबातील ही आपुलकी, वात्सल्य आणि प्रेम प्रत्येक सदस्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देते. ही आपुलकीची, प्रेमाची भावना ‘तिरुक्कुरल’ या तामिळ ग्रंथातील ‘अथिगारम् उडैय्यो कत्तलै वढु अर्ण्णे कत्तलै यन्नोदिअदु’ या श्लोकातून व्यक्त झाली आहे. याचा अर्थ असा आहे की ज्यांना अधिकार मिळाले आहेत त्यांनी आपली जबाबदारी निष्ठापूर्वक पाडावी, हे त्यांचे कर्तव्य आहे. हा विचार भारतीय कुटुंब पद्धतीची मूल्ये आणि आदर्श प्रस्थापित करतो.
 
 
समाजाचा आधारस्तंभ
भारतीय समाजात कुटुंबाकडे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात एकतेचे, त्यागाचे आणि समर्पणाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. आई-वडील, गुरू आणि वयोवृद्ध कुटुंबाचे आदर्श-मार्गदर्शक असतात. आपल्या अनुभवाने आणि ज्ञानाने ते केवळ कुटुंबातील सदस्यांना वैयक्तिक रीत्या सक्षम, करीत नाहीत तर समाज आणि राष्ट्रासाठी देखील प्रेरणास्रोत बनतात. कुटुंबाची हीच भावना ‘कुटुम्बस्य वात्सल्यं सर्वधर्माणा परिपालकम् या ओळीतून व्यक्त करण्यात आली आहे. याचा अर्थ कौटुंबिक स्नेह, नैतिक मूल्ये आणि धार्मिक कर्तव्यांच्या पालनाचा अधिकार आहे.
 
 
वामपंथी दृष्टिकोन
डाव्या अर्थात वामपंथी विचारसरणीत कुटुंबाकडे सामाजिक क्रांतीच्या मार्गात अडथळा म्हणून पाहिले जाते. कुटुंब खाजगी मालमत्ता आणि भांडवलशाही व्यवस्था राखण्यासाठी कार्य करणारी संस्था आहे, असे वामपंथी विचारवंत कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंगेल्स यांचे मत होते. त्यांच्या मते, कुटुंब समाजात वर्ग विभाजन स्थिर करते आणि क्रांतिकारी परिवर्तनाच्या मार्गात अडथळा बनते.
 
 
Indian families : स्त्रीवादी वामपंथी विचारवंत शुलामिथ फायरस्टोन याला पितृसत्तेचा आधार मानतात, जिथे स्त्रियांचे स्वातंत्र्य मर्यादित होते. विचारसरणीनुसार, परिवार, कुटुंब संस्था नष्ट करून समाजात क्रांतिकारक परिवर्तन सहजपणे घडवून आणता येते. मात्र, हा दृष्टिकोन समाज आणि राष्ट्रासाठी विनाशकारी सिद्ध होऊ शकतो. कारण कुटुंब हा समाजाच्या एकतेचा, नैतिकतेचा आधार आहे.
 
 
विघटनाचे दुष्परिणाम
कुटुंबाच्या विघटनाचा समाजाच्या आणि राष्ट्राच्या स्थैर्यावर सर्वांत मोठा परिणाम होतो. जेव्हा कुटुंबे तुटतात, विघटित होतात तेव्हा नैतिकता, शिस्त आणि सामूहिकतेचा र्‍हास होतो. त्याचा परिणाम असा होतो की ती व्यक्ती आपल्या कर्तव्यांपासून दूर जाते, कर्तव्यापासून पळ काढते, ज्यामुळे समाजात अराजकता, अव्यवस्था, असुरक्षितता आणि गुन्हेगारी वाढते. कुटुंबाच्या विघटनाने राष्ट्राची सांस्कृतिक आणि सामाजिक संरचनाही कमकुवत होते.
 
 
कुटुंब आणि समाजाला तोडून, विघटित करून राजकीय सत्ता प्राप्त करण्याच्या दिशेने काम वामपंथी विचारसरणीमुळे, दृष्टिकोनामुळे समाजात विभाजन, संघर्ष आणि अस्थिरता निर्माण होते. याच्या अगदी उलट एकता, एकजुटता आणि समर्पणातून कुटुंबाकडे पाहणारा भारतीय दृष्टिकोन समाजातील प्रत्येक घटकाच्या आणि राष्ट्राच्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त करतो.
 
 
भारतीय दृष्टिकोन
भारतीय अर्थात भारतीयांचा दृष्टिकोन केवळ भारतापुरताच मर्यादित नाही, तर ‘वसुधैव कुटुम्बकम् (संपूर्ण जग एक कुटुंब आहे) या आधारित असलेला हा विशाल, उदार असा दृष्टिकोन आहे. हा दृष्टिकोन केवळ भारताच्या समाज आणि राष्ट्रापुरताच मर्यादित नाही, तर संपूर्ण मानवतेच्या आणि जगाच्या कल्याणाची भाषा करणारा हा दृष्टिकोन आहे.
 
 
Indian families : कौटुंबिक ऐक्य, सौहार्द, सामंजस्य आणि करुणेची ही भावना समाजात शांती, सद्भाव आणि समृद्धी आणते. भगवद्गीतेतील ‘पिताऽहमस्य जगतो माता धाता पितामह:’ हा या अर्थाने महत्त्वाचा आहे. स्वत: ईश्वर सृष्टीचा पिता, माता आणि पालनकर्ता आहे, हे भगवंताचे प्रतिपादन भारतीय दृष्टिकोन स्पष्टपणे अधोरेखित करते. कुटुंब हे केवळ सामाजिक ऐक्याचे आणि विकासाचे माध्यम नसून ते धार्मिक आणि आध्यात्मिक मूल्यांचे मार्गदर्शक असल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
 
 
भारतीयांच्या जीवनात कुटुंबाची अतिशय महत्त्वाची आणि प्रभावी अशी आहे. भारतीय जीवनदृष्टीने विचार केल्यास कुटुंब केवळ समाज आणि राष्ट्राच्या स्थैर्यासाठीच आवश्यक आहेत असे नसून ते संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी अतिशय आवश्यक आहेत. कुटुंबांच्या विघटनामुळे केवळ समाजच अस्थिर होतो असे नसून यामुळे राष्ट्राची एकता आणि अखंडता देखील धोक्यात येते, हे स्पष्टपणे लक्षात घेतले पाहिजे. कुटुंबाच्या विघटनाने समाजात अस्थिरता तर येतेच, त्याच्या एकात्मतेला अखंडतेलाही धोका निर्माण होतो.
 
 
याउलट कुटुंब, समाज आणि राष्ट्राप्रती जबाबदारी, कर्तव्य आणि नैतिकतेचा संदेश देणारा भारतीयांचा दृष्टिकोन संपूर्ण जगासाठी फायदेशीर ठरू शकतो. कुटुंबाची ही व्यवस्थित, संघटित संरचना सुदृढ आणि सुरक्षित ठेवणे भारतीयांसाठी आणि मानवतेसाठी देखील आवश्यक आहे. हा तो पाया आहे ज्यावर जगाचे भविष्य अवलंबून आहे.
 
 
Indian families : कुटुंब कमकुवत असेल तितके सुरक्षिततेच्या, गरजांची सामूहिक हमी कमकुवत होईल आणि विविध प्रकारच्या वैयक्तिक हमींची व्यवस्था करावी लागेल. म्हणजे याचाच अर्थ व्यक्तीवादी विचारसरणी अधिकच वेगाने फोफावेल. हे सर्व आज आपल्या समोर घडत आहे. समाजवस्त्राचे धागे उचकटून, क्रांतीचा मार्ग अवलंबून ‘आदर्श समान समाज’ स्थापन करण्याची वामपंथी संकल्पना संपूर्ण जगात अपयशी ठरली निसर्गाचे शोषण करूनच विकासाचा मार्ग साध्य होईल हा दृष्टिकोन बाळगल्याने आज पर्यावरणाचे, निसर्ग संपदेच्या विनाशाचे गंभीर संकट ओढवले. त्यामुळे आज त्याच माणसाला निसर्ग संवर्धन व पर्यावरण संरक्षणाचे मर्म समजू लागले आहे. अगदी त्याचप्रमाणे आपली कुटुंब व्यवस्था देखील कदाचित चक्राकार वाटेने जाण्याचा विचार करत असेल! समाजाला व राष्ट्राला स्थैर्य तसेच समाधान, समृद्धी प्राप्त करून देणारी र्‍या कुटुंब व्यवस्था टिकवून ठेवणे आज काळाची गरज आहे. 
 
- (पांचजन्यवरून साभार)
Powered By Sangraha 9.0