प्रहार
jihad in Bangladesh : बांगलादेशात ५ ऑगस्ट २०२४ रोजी सत्तापालटानंतर जिहादी कट्टरपंथी सातत्याने तेथील अल्पसंख्यक हिंदूंना करीत आहेत. अलिकडे, बांगलादेशात दुर्गापूजेदरम्यान, दुर्गेची मूर्ती प्रतिष्ठापित असलेल्या पेंडॉल अर्थात मंडपांवर वारंवार हल्ले झाले. आधी दुर्गा विराजमान असलेल्या मांडवांवर हल्ले करण्यात आले आणि नंतर विसर्जनाच्या वेळी काढण्यात येणार्या मिरवणुकांना लक्ष्य करण्यात आले. गेल्या १३ ऑक्टोबर रोजी जुना ढाका येथे दुर्गा पूजेची समाप्ती झाल्यानंतर मूर्ती विसर्जनासाठी जात असलेल्या हिंदू लोकांवर विटांचा जोरदार मारा करण्यात आला, ज्यात अनेक लोक जखमी झाले होते.
पोलिस आणि लष्करही कट्टरपंथींयासोबत
‘ह्युमन राइट्स काँग्रेस फॉर बांगलादेश मायनॉरिटीज’च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, ‘विसर्जनासाठी मूर्ती घेऊन जाणार्या हिंदूंवर नूर सुपरमार्केटच्या छतावरून विटांनी हल्ला करण्यात आला. दुर्गा मूर्तींवर घाण पाणी टाकण्यात आले. दुर्गामूर्तींवर दगडफेक करणार्या गुन्हेगारांचा पाठलाग करण्याऐवजी आणि पोलिसांनी हिंदू तरुणांना अमानुषपणे लक्ष्य करून त्यांना बेदम मारहाण केली. पोलिस आणि लष्कर दोन्ही घटनास्थळी उपस्थित असतानाही त्यांनी हल्लेखोरांना रोखण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत.
jihad in Bangladesh हल्लेखोरांना पकडण्यासाठी आंदोलन करणार्या हिंदू समुदायाच्या लोकांनी जेव्हा नूर सुपरमार्केटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा लष्कर आणि पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. यामध्ये हिंदू समाजाचे हून अधिक लोक जखमी झाले. एवढेच नव्हे तर या घटनांचे चित्रीकरण करणार्या, घटनास्थळावरील हिंसक कृत्यांचा व हल्लेखोर जिहादींचे प्रत्यक्ष हल्ला करतानाचे व्हिडिओ बनवणार्या हिंदूंचे मोबाईल फोनही पोलिसांनी हिसकावून घेतले आणि त्यांनी बनवलेले व्हिडीओ डिलीट करून टाकले. हिंदू समाजाने विरोध केल्यानंतर आणि तीव्र निषेध नोंदविल्यानंतरही अद्याप कोणालाच अटक करण्यात आलेली अशाप्रकारच्या घटना किशोरगंज आणि पबनासह देशाच्या विविध भागात घटना घडल्या आहेत. अल्पसंख्यक हिंदू समाज येथे दहशत व भीतीच्या वातावरणात जगत आहे.
बांगलादेशातील पीडित हिंदू समाजाची बाजू पुराव्यांसह मांडणार्या एका हिंदू पत्रकाराचीही कट्टरवादी जिहादी मुस्लिमांनी निर्घृण हत्या केल्याचे संकेतस्थळावरील आणखी एका बातमीत नमूद करण्यात आले आहे. ही घटना १३ ऑक्टोबर घडली. ६५ वर्षीय पत्रकार व तारकंडा प्रेस क्लबचे उपाध्यक्ष स्वपन कुमार भद्र यांची त्यांच्या घरासमोर दिवसाढवळ्या निर्घृणपणे हत्या करण्यात आली. जिहादी दहशतवाद आणि अल्पसंख्याकांवरील अन्याय, अत्याचाराविरुद्ध आवाज उठविणारे व निर्भयपणे वार्तांकन करणारे पत्रकार अशी त्यांची सर्वत्र ओळख होती. स्वपन कुमार भद्र यांच्यावर शंभू गंजच्या माझीपारा येथील तानपारा भागात सकाळी वाजता हल्ला करण्यात आला. जेव्हा त्यांच्यावर हल्ला करण्यात आला तेव्हा ते घराबाहेर बसले होते. त्यांनी आरडाओरडा केला. स्थानिक रहिवासी आणि त्यांची पत्नी त्यांच्या मदतीसाठी धावले असता हल्लेखोर कट्टरपंथी तेथून निघून गेले. भद्र यांना गंभीर अवस्थेत मैमनसिंह वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. स्वपनकुमार भद्र यांचा माणिक सरकार याने सांगितले की, अल्पसंख्यक व पीडित हिंदू समाजाची बाजू घेतल्यामुळे त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यांच्या सुनेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी करून प्रश्न उपस्थित केले आहेत. व्हिडिओमध्ये ती म्हणते, ‘‘माझ्या सासर्यांच्या जीवाची किंमत इतकी कमी होती का? अन्यायाविरुद्ध उभे राहिल्याबद्दल त्यांना जिवानिशी ठार मारून टाकायचे?’’
jihad in Bangladesh बांगलादेशात झाल्यापासून हिंदूंना वाढता हिंसाचार आणि दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. बांगलादेशच्या युनूस सरकारच्या निष्क्रियतेमुळे अशा घटनांवर नियंत्रण येत नाही. सत्तापालटानंतर हिंदूंच्या व्यावसायिक प्रतिष्ठानांची, दुकानांची प्रचंड तोडफोड करण्यात आली. त्यांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले. एवढेच नव्हे तर मंदिरांचे देखील नुकसान करण्यात आले. हिंदूंनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन रस्त्यावर निषेध केला होता. तर दुसरीकडे बांगलादेशावरील आंतरराष्ट्रीय दबावामुळे अशा घटना काही प्रमाणात थांबल्या होत्या. पण नवरात्र व दुर्गापूजा सुरू होताच पुन्हा कट्टरवादी जिहादी मुस्लिमांकडून हिंदूंना लक्ष्य केले जाऊ लागले.
काली मातेचा मुकुट चोरीला
गेल्या १० ऑक्टोबर रोजी बांगलादेशातील सतखिरा परिसरातील श्यामनगर येथील जेशोरेश्वरी मंदिरातून काली मातेचा मुकुट चोरट्यांनी पळविला. नरेंद्र मोदी यांनी मार्च २०२१ मध्ये आपल्या बांगलादेश दौर्याप्रसंगी हा मुकुट मंदिराला भेट म्हणून दिला होता. बांगलादेशचे वृत्तपत्र ‘द डेली स्टार’च्या वृत्तानुसार ही चोरी दुपारी २.०० ते २.३० च्या दरम्यान घडली.
मंदिराचे पुजारी दिलीप मुखर्जी दिवसभराच्या पूजेनंतर घरी निघून गेले होते. विशेष म्हणजे जेशोरेश्वरी मंदिर हे ५१ शक्तिपीठांपैकी एक बांगलादेश सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने व सखोल चौकशी करण्याऐवजी काली मातेचा सोन्याचा मुकुट चोरीला गेल्याबद्दल मंदिराचे पुजारी आणि कर्मचार्यांनाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला. ‘सतखिरा जिल्ह्यातील जेशोरेश्वरी काली मंदिरातून सोन्याचा मुकुट चोरीला गेल्याच्या प्रकरणात हे पुढे आले आहे की, मुख्य पुजार्याने त्या दिवशी दुपारी अडीच वाजेपर्यंत नियमित पूजाविधी केला होता. मुकुट तिथेच होता,’ असे बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
भारत सरकारची कठोर भूमिका
jihad in Bangladesh बांगलादेशात सातत्याने घडत असलेल्या अशाप्रकारच्या घटनांविषयी भारत सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. अशा प्रकारच्या घटना निंदास्पद असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. बांगलादेशात मंदिरे आणि देवतांची विटंबना करण्याचे व त्यांचे नुकसान करण्याचे नियोजित पद्धतीने केले जात आहे. यावर ताबडतोब नियंत्रण यायला हवे, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने रोखठोकपणे बजावले आहे.
दुर्गापूजेच्या वेळी घडलेल्या प्रमुख उन्मादी घटना
- २८ ऑगस्ट रोजी १८ वर्षीय रब्बी हुसेनने पसरविलेल्या अफवेमुळे बांगलादेशातील कालीग्राम सार्वजनिक दुर्गा मंदिराची तोडफोड करण्यात आली. भारताने सोडलेल्या धरण्यातील पाण्यामुळे पूर आल्याची अफवा रब्बी पसरवली होती.
- १० सप्टेंबर रोजी, बांगलादेशच्या गृह मंत्रालयाने दुर्गा पूजा उत्सवापूर्वी हिंदू समुदायाला उद्देशून एक आदेश जारी केला. ‘नमाजच्या पाच मिनिटे आधी दुर्गा पूजा विधी-अनुष्ठान आणि लाऊडस्पीकर बंद करण्याचे निर्देश मंत्रालयाने पूजा समित्यांना दिले.
- २२ सप्टेंबर रोजी, खुलना येथे दंगलखोरांनी दुर्गा पूजेचा मांडव उभारणार्या आयोजकांना धमकी दिली जर त्यांनी ५ लाख रुपये दिले नाहीत तर त्यांना पूजा आयोजित करू देणार नाही. याचे गंभीर परिणामही आयोजकांना भोगावे लागतील.
- २५ सप्टेंबर रोजी, बांगलादेशातील गौरीपूर येथे २२ वर्षीय यासीन मियाँने मांडवातील दुर्गा मूर्ती फोडून टाकल्या.
- २७ सप्टेंबर रोजी, बांगलादेशातील उत्तरा येथील सेक्टर ११ आणि १३ मध्ये आयोजित पूजेला मशिदीचे मौलाना आणि विद्यार्थ्यांनी विरोध केला. येथे लावण्यात आलेला दुर्गा पूजेचा मांडव जबरदस्तीने हटवण्यात आला.
- १ ऑक्टोबर रोजी, जिहादी दंगलखोरांनी बांगलादेशच्या राजशाही विभागातील ऋषिपारा बरवारी पूजा मंडपातील चार मूर्ती आणि मणिकाडी पालपारा बरवारी दुर्गा पूजा मांडवातील पाच मूर्तींचे नुकसान केले. यामुळे परिसरातील हिंदू अतिशय भयभीत झाले.
- 2 ऑक्टोबर रोजी बांगलादेशातील पबना येथील सुजानगर येथील पालपारा दुर्गा मंदिरात जिहादी कट्टरवाद्यांनी दुर्गापूजेसाठी बनविण्यात येणार्या तीन मूर्तींची तोडफोड केली.
- ३ ऑक्टोबर रोजी ढाका येथील किशोरगंज येथील गोपीनाथ जिउर आखाडा दुर्गापूजा उत्सवात स्थापित केलेल्या ७ मूर्तींची प्रचंड तोडफोड करण्यात आली. धर्मांध जिहादी भिंतीवरून उड्या मारून आत घुसले होते. त्याच बांगलादेशातील कोमिला येथे कट्टरपंथीयांनी दुर्गा मूर्ती फोडली आणि मंदिरातील दानपेटीची लूट केली. यासंदर्भात आयोजकांनी मुस्लिम संघटनांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दुर्गापूजेला परवानगी देण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्याच दिवशी शेरपूर जिल्ह्यात रात्री उशिरा कट्टरवाद्यांनी मंदिराचे कुलूप तोडून दुर्गा मूर्तीची तोडफोड केली.
- ४ ऑक्टोबर रोजी बांगलादेशातील बरिसाल येथील गावात धार्मिक, उन्मादी कट्टरतावाद्यांनी प्रवेश केला व त्यांनी मांडवात प्रतिष्ठातील केलेल्या अनेक दुर्गा मूर्तींची प्रचंड तोडफोड केली.
- ८ ऑक्टोबर रोजी इस्लामिक कट्टरवाद्यांनी बांगलादेशातील राजबाडी येथील दुर्गा मंदिरात घुसून तेथील मूर्ती फोडून टाकल्या आणि मंदिरातील पुजार्यालाही मारहाण केली.
- ९ ऑक्टोबर रोजी चितगावमध्ये दुर्गापूजेदरम्यान इस्लामिक जिहादी कट्टरपंथीयांनी दुर्गेची प्रतिष्ठापना मांडवात प्रवेश केला. तिथे आल्यानंतर हे धर्मांध जिहादी मंचावर चढले आणि इस्लामिक नारे देऊ लागले. त्यांनी मांडवात उपस्थित हिंदूंना धमकावले. नेहमीप्रमाणे स्थानिक पोलिसांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सहा जणांना अटक करण्यात आली. ‘आम्ही पाहुण्यांचे स्वागत करण्यात मग्न होतो. काही लोकांनी इस्लामिक गीते म्हणण्यास प्रारंभ पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत,’ असे येथील पूजा समितीचे अध्यक्ष आशीष भट्टाचार्य यांनी सांगितले.
- ११ ऑक्टोबर रोजी धार्मिक कट्टरपंथीयांनी ढाक्यातील ताटी बाजार भागात एका पूजा मंडपावर पेट्रोल बॉम्बने हल्ला होता. बॉम्बस्फोटामुळे तेथे प्रचंड चेंगराचेंगरी झाली. या काळात अनेक जण जखमी झाले.
(पांचजन्यवरून साभार)