दोन वर्षानंतर मुलीला भेटल्यानंतर हसीन जहाँने शमीवर लावले गंभीर आरोप

04 Oct 2024 11:42:54
नवी दिल्ली, 
Shami meet his daughter टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी नुकतीच आपल्या मुलीला खूप दिवसांनी भेटला. या भेटीचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. व्हिडिओमध्ये शमी आपल्या मुलीसोबत शॉपिंग करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत शमीने लिहिले होते, "जेव्हा मी तिला खूप दिवसांनी पुन्हा पाहिले, तेव्हा वेळ थांबला. बेबो, मी तुझ्यावर शब्दांपेक्षा जास्त प्रेम करतो." शमीची ही भावनिक पोस्ट चाहत्यांना खूप आवडली. मात्र, आता त्याच्यापासून वेगळी राहत असलेली त्याची पत्नी हसीन जहाँने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
 
 
Shami meet his daughter
 
हसीन जहाँने एका मुलाखतीत सांगितले की, "हे फक्त दाखवण्यासाठी आहे. माझ्या मुलीच्या पासपोर्टची मुदत संपली आहे. नवीन पासपोर्टसाठी शमीची सही आवश्यक आहे. त्यामुळे ती तिच्या वडिलांना भेटायला गेली होती, पण शमीने सही केली नाही. तो आपल्या मुलीला शॉपिंग मॉलमध्ये घेऊन गेला. Shami meet his daughter शमी ज्या कंपनीसाठी जाहिराती करतो ती कंपनी त्याला तिथे घेऊन गेली. माझ्या मुलीने त्या दुकानातून बूट आणि कपडे घेतले. तिथून काहीही खरेदी करण्यासाठी शमीला पैसे द्यावे लागत नाहीत. त्यामुळे त्याला तेथे नेण्यात आले. माझ्या मुलीला गिटार आणि कॅमेरा हवा होता, त्यांनी ती वस्तू विकत घेऊन दिली नाही."
 
सौजन्य : सोशल मीडिया 
रिपोर्टनुसार हसीन जहाँ पुढे म्हणाली, "शमी कधीच माझ्या मुलीबद्दल विचारत नाही. शमी फक्त स्वतःमध्ये व्यस्त आहे. तो तिला फक्त एक महिन्यापूर्वी भेटला होता, पण नंतर त्याने काहीही पोस्ट केले नाही. मला वाटतं आता त्याच्याकडे पोस्ट करण्यासाठी काहीच नव्हतं, त्यामुळे त्याने हा व्हिडिओ अपलोड केला आहे. मोहम्मद शमीने त्याची पत्नी हसीन जहाँपासून कायदेशीररित्या घटस्फोट घेतलेला नाही. Shami meet his daughter मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दोघेही वेगळे राहिले. शमीला हसीन जहाँला दर महिन्याला १ लाख ३० हजार रुपये द्यावे लागतील, असा निकाल न्यायालयाने दिला होता. यापैकी 80 हजार रुपये हसीन जहाँच्या मुलीच्या पालनपोषणासाठी असतील. उर्वरित ५० हजार रुपये हसीन जहाँसाठी वैयक्तिक देखभाल भत्ता असेल. शमी २०१८ मध्ये पत्नीपासून विभक्त झाला होता.
Powered By Sangraha 9.0