निसर्गाच्या कुशीत वसलेली भोंडाई माता

बोरी बोरधरणचे ग्रामदैवत

    दिनांक :07-Oct-2024
Total Views |
सेलू
निसर्गाच्या कुशीत टेकडीवर bhondai mata वसलेल्या भोंडाई माता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त दर्शनाकरिता भाविकांची गर्दी आहे. नवरात्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. नवसाला पावणारी भोंडाई माता बोरी बोरधरणचे ग्रामदैवत आहे.
 
              
mata
 
बोरी bhondai mata गावापासून ३ किलोमीटर अंतरावर जंगलात जुना आडेगाव पायदळ रस्त्यावर चौकी नाव असलेल्या ठिकाणी निसर्गाच्या कुशीत प्राचीन भोंडाई मातेचे मंदिर आहे. इथे मनमोहक माता राणीची मूर्ती स्थापित केली आहे. ही स्वयंभू मूर्ती असल्याचे नागरिकाचे म्हणणे आहे. ही मूर्ती बोरीच्या गावठाण मध्ये असल्याचे नागरिक सांगतात. हिंगणी ते आडेगाव मार्गावर दाट जंगलाच्या मध्यभागी मंदिर असल्याने भक्त रोज पूजा करीत होते. नारायण उमाटे रा. घोराड येथील माता राणीचे मोठे भक्त असल्याचे नागरिक सांगतात. त्यांनी लोकवर्गणीतून मंदिराचे बांधकाम केले.
घनदाट जंगल bhondai mata असल्याने इथे बैलगाडीने भक्तांना यावे लागत असे. भाविक येथे पुरण पोळीचा नैवेद्य करतात. पूर्वी येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने बैलगाडीने पाणी आणावे लागत असे. येथील, नागरिकांनी वर्गणी करून उमाटे यांच्याकडे दिली. यानंतर विहिरीचे खोदकाम केले. खोदकाम करताना मोठ्या प्रमाणात काळा दगड लागल्याने विहिरीला पाणी लागले नाही. परंतु, नागरिकांनी देवीची आराधना केली व या विहिरीत पाणीसाठा जमा झाला. तो आजही मोठ्या प्रमाणात उपसा झाल्यानंतर जशास तसा भरून जातो.
येथील व्यवस्था उमाटे महाराज, मनोज करपाते, सुधीर चौधरी, राजू कुभरे, किशोर राऊत, श्रीकांत कोकाटे, पोलिस पाटील विकास कोकाटे, दुर्गेश बावणे पाहतात. येथे रोज पहाटे 6 वाजता काकड आरती आणि संध्याकाळी आरती होते.