मोठी बातमी ! हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात...

    दिनांक :07-Oct-2024
Total Views |
इंदापूर,
भाजपा सोडल्यानंतर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील harshvardhan patel यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून विधानसभा निवडणूक लढवावी, अशी आग्रही इच्छा समर्थकांनी व्यक्त केली, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. यापूर्वी त्यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. लोकशाहीत राजकीय पक्षांपेक्षा लोक महत्त्वाचे असतात, असे ते म्हणाले.
 
 

harshavardhan patil  
 
हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रीय सहकारी  harshvardhan patel साखर कारखाना संघटनेचे अध्यक्ष आहेत. ते मागील आठवड्यात भाजपातून बाहेर पडले. इंदापूर हे बारामती लोकसभा मतदारसंघात येते. हर्षवर्धन पाटील यांनी ३ ऑक्टोबर रोजी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी आपल्या पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवावी, असे शरद पवार यांनी त्यांना सांगितले होते. मी तुम्हाला निवडून आणेल, असे शरद पवार यांनी सांगितले असल्याचा दावा पाटील यांनी केला. मागील वेळी जिंकलेल्यांना इंदापूरची उमेदवारी दिली जाईल, असे राकाँचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्यानंतर हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात जातील, असा अंदाज वर्तवला जात होता. चार वेळा या मतदारसंघात निवडून आलेल्या पाटील यांनी यावेळी पुन्हा येथून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावेळी महायुतीतील घटकपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. दत्तात्रेय भरणे यांना या जागेवरून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.