भक्तांना तारणारी शिरपूरची आई भवानी !

07 Oct 2024 18:16:26
शिरपूर जैन, 
अति प्राचीन देवस्थान म्हणून श्री आई भवानी navratri 2024 माता संस्थान हे दूर दूर गावी राहणार्‍या भाविकात जागृत आहे. येथे नेहमीच भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. त्यात विशेष करून नवरात्रोत्सवात भाविकांची मोठी वर्दळ येथे पाहायला मिळते.आई भवानी संस्थानला जागृत देवस्थान म्हणून परिसरात मान्यता आहे.
 

aai bhavani 
 
 
शिरपूर गावात श्री भवानी संस्थान बरोबरच navratri 2024 इतरही देव देवतांचे व संत महात्म्यांचे प्रसिद्ध मंदिरे आहेत. यामध्ये अग्रगण्य श्री आई भवानी संस्थांन असून, हे जागृत संस्थान गावाच्या दक्षिण दिशेला निसर्गरम्य परिसरात वसलेले आहे. या मंदिरातील देवींची मूर्ती अतिप्राचीन आहे. येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सव साजरा केला जातो. येथील जानगीर महाराज सस्थांनचे तृतीय मठाधिपती प.पू. ओंकारगिर महाराज यांनी या नवरात्र उत्सवास सुरुवात केल्याचे गावकरी सांगतात. सदर मंदिर हे पूर्वी छोट्या स्वरूपात व अति प्राचीन होते. मात्र माजी आ. विजयराव जाधव यांनी सदर मंदिरास सभामंडप उभारून दिला व त्याच वेळी मंदिराचा मोठ्या प्रमाणात जीर्णोद्धार करण्यात आला.
 
 
ह्या संस्थानातील देवीची मूर्ती ही रेणुका माते navratri 2024 सारखी दिसत असून मंदिराचे द्वार हे पूर्वाभिमुख आहे तर मंदिर परिसरात बारमाही पाण्याचे बारव असून, समोरच अति प्राचीन दीपमाला आहे. सदर संस्थान हे परिसरात व बाहेर गावातही जागृत संस्थान म्हणून प्रसिद्ध असल्याने येथे दर्शनासाठी भाविकांची रीघ असते. सध्या नवरात्र उत्सव सुरू झाल्याने भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.सकाळी व संध्याकाळी दररोज आरती केली जाते. या मंदिराला फार पुरातन इतिहास लाभलेला असल्याचे वयोवृद्ध मंडळी व जाणकाराकडून सांगण्यात येते. श्री आई भवानी मंदिर परिसरात श्री गजानन महाराज मंदिर, श्री बलखंडी हनुमान मंदिर तसेच महादेवाचे मंदिर आहे. देशमुख परिवाराच्या वतीने मंदिराचा कारभार चालवण्यात येतो.
Powered By Sangraha 9.0