एसटी महामंडळाची कोराडी दर्शनासाठी विशेष सेवा!

08 Oct 2024 19:27:05
नागपूर,
Koradi Darshan : कोराडी आणि माहूरगड या दोन्ही जागृत देवस्थानस्थळी भाविकांना दर्शनासाठी घेऊन जाण्यासाठी महामंडळाने विशेष बसगाड्यांची सोय केली आहे. नवरात्रीच्या पावन पर्वात भक्तांना दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाने बसगाड्यांची सोय केली आहे.
 
 
ST KORADI
 
 
 
गणेशपेठ बसस्थानकावरून कोराडी मंदिरात माता महालक्ष्मी जगदंबेच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांसाठी गणेशपेठ येथून दर १५ मिनिटांनी बसची सोय करून दिली आहे. याशिवाय माहूरच्या रेणुका आईच्या दर्शनासाठी भाविकांना रोज सकाळी वाजता आणि सकाळी ८.४५ वाजता या बसगाड्या उपलब्ध असल्याची माहिती एसटी महामंडळाचे नागपूर प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभने यांनी दिली आहे.
Powered By Sangraha 9.0