दक्षिणेची वैष्णवदेवी महाकाली

    दिनांक :08-Oct-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
Vaishnava Devi Mahakali : वर्धा कारंजा (घा.) मार्गावर जंगल परिसरात असलेले महाकाली मंदिर आता विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्र आणि लगतच्या राज्यात दक्षिणेची वैष्णोदेवी म्हणून ओळखल्या जाते. अश्विन आणि चैत्र नवरात्रात येथे दर्शनासाठी भक्तांचा मेळा असतो. जुने आणि नवीन असा वाद असला तरी नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिर आणि शासनाच्या वादात अडकलेल्या मंदिरातील व्यवस्थेत असलेला फरक भक्तांच्या नजरेतून सुटत नसल्याने स्वप्नात आलेल्या महालक्ष्मी, महासरस्वती व महाकाली या तीन नवसाला पावत असल्याची आख्यायिका आहे.
 
 
devi
 
 
या तिर्थक्षेत्राचा विकास व भाविक भक्तांच्या सोयीसाठी जय महाकाली सेवा मंडळाकडून विविध सेवा पुरवण्यात येत आहे. पिण्याच्या भोजनाची व्यवस्था मंदिराकडे जाणारे रस्ते धार्मिक कार्यक्रमाकरिता सभामंडप तसेच पुजा होम हवन, महाप्रसाद इतर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
 
 
पुरातन मंदिर जलाशयात बुडाल्याच्या पूर्वी जे भक्त तेथे पूजा करीत होते त्यांनी पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांच्या पुढाकारात एकत्र येऊन त्याच परिसरात डोहवाले बाबा यांच्या मंदिराजवळ देवीचे मंदिर बांधले. त्याच ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा केला जातो. येथे पंधरवाडी नवरात्र, अमावस्या पौर्णिमा, अखंड ज्योत असे अनेक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात येतात. येथील पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांच्या स्वप्नात येऊन माझे मंदिर बांध असा दृष्टांत दिला. त्यामुळे पं. अग्निहोत्री यांनी नव्याने माता महालक्ष्मी, महासरस्वती व महाकाली या त्री देवींचे मंदिर बांधले. काही वषार्र्पूर्वी शासकीय मंदिराचा हक्कही पं. अग्निहोत्री यांना देण्यात आला होता. परंतु, धार्मिक कार्यक्रमातही राजकारण झाले आणि आज त्या मंदिरात नाममात्र उत्सव होतो. नवरात्रात बसेसची व्यवस्था करण्यात येते.
 
 
येथे गावखेड्यातून हजारो भक्त दर्शनासाठी येतात. विश्वस्तांच्या वतीने मंदिराची काळजी घेतली जात असली तरी क वर्ग तिर्थस्थळाचा दर्जा मिळालेल्या या देवस्थाचा शासनाकडून पाहिजे तसा विकास होऊ शकला नाही. धरणाच्या काठावर असलेले मंदिर, भक्तांची बाराही महिने गर्दी लक्षात घेता हा पर्यटनस्थळ म्हणून विकास झाल्यास मोठ्या प्रमाणात व्यवसायाला चालणा मिळू शकते. या परिसराचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्याची मागणी करण्यात येत आहे.