नोव्हेंबरमध्ये पूर्ण होणार ‘द राजा साब' चे चित्रीकरण

08 Oct 2024 18:28:40
मुंबई,
The Raja Saab सुपरस्टार प्रभास ‘द राजा साब' या तेलुगू चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. सध्या या चित्रपटाची चर्चा जोरदार सुरू आहे. या चित्रपटात प्रभाससोबत मालविका मोहनन मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. हा बिग बजेट चित्रपट मारुथी दिग्दर्शित करीत आहेत.The Raja Saab
 
 
prabhas
 
 
The Raja Saab या चित्रपटाचे चित्रीकरण नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती चित्रपटाचे निर्माते टी. जी. विश्व प्रसाद यांनी दिली. ‘द राजा साब' हा चित्रपट १० एप्रिल २०२५ ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे एकूण बजेट ४०० कोटी रुपये असणार आहे. या चित्रपटात प्रभास आणि मालविका मोहनन सोबत निधी अग्रवाल अणि रिद्धी अग्रवाल यांच्या देखील भूमिका आहेत. The Raja Saab
 
 
Powered By Sangraha 9.0