बदलत्या मानसिकतेचे घातक दुष्परिणाम

09 Oct 2024 06:00:00
वेध
- गिरीश शेरेकर
'Love Jihad' उत्तम ग्रंथ व पुस्तकांचे वाचन आणि सज्जनांचा सहवास ही जीवनाची दोन मधुर फळे आहेत, याचे विस्मरण हल्ली अनेक युवकांना झाले आहे. परिणामस्वरूप देश, राज्य, जिल्हा, तालुका व गाव पातळीवर आजूबाजूला नजर टाकल्यास अविवेकी, शीघ्रकोपी, गुन्हेगारी, अनैतिक मानसिकता जोपासलेल्या युवकांच्या टोळ्या प्रामुख्याने पाहायला मिळत आहेत. गेल्या तीन-चार वर्षांत हे प्रमाण कमालीचे वाढले आहे. होत असलेल्या या बदलाचे परिणाम त्या युवकांच्या कुटुंबासाठी जेवढे घातक आहे, तेवढेच ते समाजासाठी चिंतेचे झाले आहे. ही मानसिकता एकाएकी बदललेली नाही. जीवनशैलीच्या बदलत्या स्वरूपातून युवकांमध्ये जशी विलासीवृत्ती वाढली तशीच अतिमहत्त्वाकांक्षाही वाढीस लागल्याने चांगले व वाईट यातला फरक समजून वाटचाल करण्याचे भान त्यांना राहिलेले नाही. त्यांच्यातल्या या परिवर्तनाकडे कुटुंबातील वडीलधाèया मंडळीचेही दुर्लक्ष होत आहे. वयात येणारी आपली मुले-मुली दररोज जातात कुठे? त्यांचा मित्र परिवार कोणता? ते घरी जे सांगतात तेच ते प्रत्यक्षात करतात का? त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही सत्य की असत्य? या सर्व प्रश्नांची उत्तरे बहुतांश पालक आपल्या पाल्यांकडून घेत नसल्याने ते सैरभैर झाले आहेत. त्याला समस्येचे स्वरूप तर आलेच आहे; पण ते आता विक्राळ रूप धारण करीत असल्याचे अलिकडच्या काळात घडलेल्या अनेक घटनांवरून सिद्ध झाले आहे.
 
 
Love Jihad
 
अमरावती जिल्ह्यात गेल्या तीन-चार महिन्यांत हत्या, बलात्कारासह अनेक गुन्हेगारी घटना घडल्या. काल तर तीन युवकांच्या हत्या झाल्या आणि हत्या करणारेही युवकच होते. या घटना धक्कादायक आहेत. क्षुल्लक कारणावरून या हत्या झाल्या आहेत. विदर्भाच्या अन्य जिल्ह्यात, राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि देशातल्या इतर भागांमध्येही अशा घटना घडत आहेत. अमरावती त्याला काही अपवाद नाही. पण, हत्या करणाèयांच्या मानसिकतेचा अभ्यास केला तर त्यांच्यात वाढलेल्या qहसक वृत्तीचा परिचय येतो. आता ही वृत्ती आली कुठून, हा स्वाभाविकपणे पडणारा प्रश्न असला, तरी त्याचे उत्तर विस्कटत जाणाèया समाज व्यवस्थेच्या जडणघडणीत आहे. हेच सूत्र कमी-अधिक प्रमाणात इतर घटनांसाठी लागू होते. बदलापूर, वरोडा येथील मुलींवरच्या अत्याचाराच्या घटना बोलक्या आहेत. एक विकृत मानसिकता जोपासून मुलींचे लैंगिक शोषण होताना दिसते. दररोज कुठे ना कुठे अशा घटना उजेडात येत आहेत. त्यातल्या काही 'Love Jihad' ‘लव्ह जिहाद' या प्रकारात मोडणाऱ्या आहेत तर काही समाज व्यवस्थेला गालबोट लावण्याच्या उद्देशातून केलेल्या आहेत. पण, अनेक मुलींना हा आपल्यासाठी लावलेला सापळा आहे, हे वेळीच लक्षात येत नाही. सापळ्यात पूर्णपणे अडकल्यावर त्यांना जाणीव होते, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्याचे परिणाम मुलीला जेवढे भोगावे लागतात, तेवढेच ते परिवारालाही सहन करावे लागतात.
 
 
'Love Jihad' : विशेष म्हणजे मुलीच अशा सापळ्यात अडकतात असे नाही तर मुलेही त्यात अडकली आहेत. अशा घटनांमधील काही मुला-मुलींनी आपले जीवनही संपवून टाकले आहे. समाजात घडणाऱ्या या मन हेलावणाऱ्या घटनांमधून बोध घेण्याची कोणाची तयारी आहे, असे दिसत नाही. कारण, घटनांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहे. उथळपणे वागणे, बोलणे व वेशभूषा करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. बाजूचा करतो म्हणून आपणही केले पाहिजे, या मानसिकतेतून ही स्पर्धा आता वेगळ्या वळणावर आली आहे. भूलथापा देऊन फसवणूक करण्याच्या ज्या घटना समोर येतात, त्या आरोपींच्या यादीतही युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसतो आहे. शॉटकट मार्गाने यश मिळविण्याचा जडलेला हव्यास त्यासाठी कारणीभूत आहे. मग त्यासाठी वाट्टेल त्या मार्गाने जाण्याची मानसिकता युवकांमध्ये दिवसेंदिवस प्रबळ होत आहे. त्याचे दुष्परिणाम आपल्याला पदोपदी पाहायला मिळत आहेत. विवाहबद्ध झालेले तरुण-तरुणीसुद्धा अविवेकी निर्णय घेताना दिसतात. आभासी जगतातून ही मनोवृत्ती फोफावली असून त्याला कुटुंबातले सदस्य नकळत खतपाणी घालतात. पालकांनी आत्मचिंतन करून आपल्या पाल्यांच्या मानसिकतेचा वेळोवेळी अभ्यास करण्याची गरज आहे. शिथिल झालेली पकड घट्ट करून पाल्यांच्या प्रत्येक घडामोडीकडे लक्ष ठेवत वेळातला वेळ काढून त्यांच्याशी संवाद साधायला हवा. तेव्हाच मानसिकतेतला बदल आणि त्याचे दुष्परिणाम थांबतील.
- ९४२०७२१२२५
Powered By Sangraha 9.0