मिल्टन चक्रीवादळामुळे विध्वंस...अलर्ट जारी

09 Oct 2024 09:37:24
फ्लोरिडा, 
Hurricane Milton अमेरिकेत 10 दिवसांत दुसऱ्यांदा मोठे वादळ धडकणार आहे. मिल्टन चक्रीवादळाच्या संदर्भात फ्लोरिडामध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. राष्ट्रीय चक्रीवादळ केंद्राने याला सर्वात विनाशकारी वादळांच्या श्रेणी 5 मध्ये ठेवले आहे. या श्रेणीतील वादळामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होण्याचा धोका आहे. मिल्टन चक्रीवादळ बुधवारी म्हणजेच आज फ्लोरिडा येथील टाम्पा खाडीला धडकू शकते. वादळामुळे 1 दशलक्षाहून अधिक लोकांना ताम्पा खाडी क्षेत्र रिकामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले, परिणामी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी आणि इंधनाची कमतरता निर्माण झाली.
 हेही वाचा : मारला गेला नसराल्लाहचा भाऊ!
 
yclon
 
हेही वाचा : पृथ्वीच्या 700 किलोमीटर खाली आहे 3 पट मोठा समुद्र!  
वादळामुळे टाम्पा खाडीच्या उत्तरेला आणि दक्षिणेला समुद्रकिनाऱ्यांवर 10 ते 15 फूट उंच लाटा येण्याची शक्यता आहे. यूएस नॅशनल हरिकेन सेंटरने 254 मिमी किंवा त्याहून अधिक पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, पुराचा धोकाही कायम आहे. वादळामुळे हवाई वाहतुकीवर वाईट परिणाम झाला असून जवळपास 900 देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे उशीर झाली आहेत. बुधवारी नियोजित 1,500 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. Hurricane Milton मिल्टन चक्रीवादळ सध्या मेक्सिकोच्या खाडीतून जात आहे. मंगळवारपर्यंत वादळाचा वेग ताशी 285 किलोमीटर इतका होता. दरम्यान, फ्लोरिडातील किनारी भाग रिकामा करण्यात आला आहे. जवळपास 5 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. याआधी हेलन चक्रीवादळाने अमेरिकेत विध्वंस केला होता. हेलन चक्रीवादळामुळे 225 जणांना जीव गमवावा लागला.
Powered By Sangraha 9.0