तुमच्या घराची आणि कारची EMI वाढणार नाही!

09 Oct 2024 10:31:15
नवी दिल्ली,
RBI MPC Meeting 2024 भारतीय रिझर्व्ह बँकेने सलग दहाव्यांदा रेपो दर ६.५ टक्के कायम ठेवला आहे, तथापि, आरबीआयने आपली भूमिका बदलून 'तटस्थ' केली आहे. चलनविषयक धोरण समितीची (एमपीसी) तीन दिवसीय बैठक सोमवारी (७ ऑक्टोबर) सुरू झाली. आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. रेपो दर म्हणजे रिझर्व्ह बँक इतर बँकांना ज्या दराने कर्ज देते. जेव्हा रेपो दर वाढतो, तेव्हा बँकांना रिझर्व्ह बँकेकडून महागड्या दराने कर्ज मिळते. यूएस फेडरल रिझर्व्हने बेंचमार्क दरात 50 बेसिस पॉइंट्सने कपात केल्यानंतर रिझर्व्ह बँकेची ही पहिली धोरणात्मक घोषणा आहे.
 हेही वाचा : मारला गेला नसराल्लाहचा भाऊ!
 

rbi 
 
हेही वाचा : पृथ्वीच्या 700 किलोमीटर खाली आहे 3 पट मोठा समुद्र!  
फेब्रुवारी 2023 पासून रेपो दर 6.5 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) वर आधारित किरकोळ महागाई 4 टक्के (2 टक्के वर किंवा खाली) राहील याची खात्री करण्याचे काम सरकारने RBI वर सोपवले आहे. सेंट्रल बँकेने ठरवून दिलेल्या मर्यादेत चलनवाढ ठेवणे आणि आर्थिक विकासाला गती देण्याच्या उद्देशाने पॉलिसी रेट अपरिवर्तित ठेवण्यात आला आहे. RBI MPC Meeting 2024 चलनविषयक धोरण समितीच्या निर्णयांची घोषणा करताना, आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, चलनवाढीचा दर मंद आणि असमान राहील. पहिल्या तिमाहीत 8 प्रमुख उद्योगांच्या उत्पादनात 1.8% ने घट झाली आहे. त्याच वेळी, सरकारी वापर सुधारत आहे. अतिवृष्टीमुळे वीज, कोळसा आणि सिमेंटसारख्या काही उद्योगांवर परिणाम झाला आहे.
 
Powered By Sangraha 9.0