प्रतीक्षा यादीतील १०५८ उमेदवारांना एसटी सेवेत घेणार

09 Oct 2024 17:49:35
मुंबई
state transport सरळ सेवा भरती २०१९ अंतर्गत अतिरिक्त यादीवरील एकूण १०५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेमध्ये चालक तथा वाहक पदावर सामावून घेतले जाणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिली.
२०१९ च्या भरतीमध्ये निवड झालेल्यांपैकी गैरहजर अथवा अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या ऐवजी त्याच भरतीमधील प्रतीक्षा यादीवरील सुमारे ३३७ उमेदवारांना नेमणूक देण्याची प्रक्रिया महामंडळात सुरू करण्यात येत आहे. प्रतीक्षा यादीवरील उर्वरित सर्व ७२१ उमेदवारांना गरज आणि रिक्त जागांनुसार एसटी महामंडळात सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
 
 
 
bus
 
 
 
 
या state transport संदर्भात संबंधित उमेदवार, लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांना भेटून निवेदन दिले होते. त्यांच्या निवेदनाचा विचार करून त्यांना तातडीने नेमणुका देण्याच्या सूचना भरत गोगावले यांनी एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दिल्या होत्या.
 
मुंबई-पुणे state transport मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका ‘शिवनेरी सुंदरी' नेमण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल, अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे, असे भरत गोगावले यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0