गीतार्थ थोरवी!

10 Nov 2024 05:45:00
संत प्रबोधन 
 
Saint Awakening भारतीय ग्रंथ सारस्वतामध्ये सर्वांचा मुकुटमणी म्हणून कोणता ग्रंथ असेल तर भगवद्गीता होय. प्राचीन भरतवर्षातील या ग्रंथाने जीवन कसे जगावे, याचा आदर्श वस्तुपाठच विशद केला आहे. अर्जुन या ग्रंथाचा नायक असून भगवान श्रीकृष्ण महानायक आहेत. आपल्या प्राणसख्या असणार्‍या अर्जुनाला त्याच्या जीवनातील अडचणी सोडविण्यासाठी श्रीकृष्णाने सांगितलेले जीवनावश्यक तत्त्वज्ञान म्हणजे युद्धभूमीवरील गीता ग्रंथ होय. मानवी जीवनसुद्धा एक युद्धभूमी असून प्रत्येकाला आपले जीवन प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी एका आदर्श आवश्यकता असते. खर्‍या ज्ञानाची गरज भासते. जेव्हा हे मानवी जीवन काय करावे? काय करू नये? अशा द्वंदामध्ये सापडते तेव्हा कोणता विचार अंगीकारावा, हा प्रश्न पडतो. त्यावेळी एकच भगवद्गीता विचार आपल्या सर्व प्रश्नांना उत्तर शोधून देऊ शकते. मानवी जीवनात उत्पन्न होणार्‍या अनेक परिस्थितींची व प्रश्नांची उत्तरे या ग्रंथातून प्राप्त होतात. प्रत्येकाने हा गीता विचार अंगीकारावा. मानवाला जेव्हा आपले शरीर आणि मन यांच्या माध्यमातून अनेक दुःख आणि अडचणींचा सामना करावा लागतो तेव्हा त्याने भविष्यकाराला आपला हात दाखविण्यापेक्षा भगवान श्रीकृष्णांना शरण जाऊन भगवद्गीतेतील परमेश्वरासोबत असलेल्या आपल्या वास्तविक संबंधांना समजून घेण्याची खरी वेळ जीवनात आलेली असते.
 
 
geeta
 
Saint Awakening भगवगद्गीता ही सर्वांची माउली आहे. सर्वांना जीवनाचे अंतिम ध्येय काय? ते प्राप्त करण्यासाठी तू कोणते कर्म करीत आहेस, असा प्रश्न विचारीत असते. ते सर्व प्रश्न सोडविण्यासाठी सदोदित मार्ग दाखवित असते. गीतेचा कर्मसिद्धांत हा मानवी जीवनाला मिळालेला अमृतकुंभच होय. त्या एका सिद्धांताचे पालन प्रत्येकाने केले तर आज मानवी जीवनातील असंख्य समस्यांना निश्चितच उत्तर सापडेल. भगवान श्रीकृष्णांनी तोच महत्त्वाचा विचार सांगितला होता. तू तुझे नियत कर्म कर, परिस्थिती कोणतीही असो.
 
 
यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः|
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम॥
अर्जुनाने जेव्हा युद्धामध्ये माझ्या समोर माझे काका, मामा, गुरू आहेत. युद्ध कसे करू, असा प्रश्न केला तेव्हा, श्रीकृष्णांनी आपल्या समोर आलेल्या परिस्थितीचा सामना तू कर, असे तुझे कर्मच तुला तुझ्या समस्येचे निराकरण करणार आहे.
 
 
यत्करोषि यदक्श्र्नासि ददासि यत् |
यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् ॥ (९/२७)
स्वतःच्या कर्मानेच मनुष्य हा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत असतो. स्वकर्मेच त्याला विशिष्ट ठिकाणी पोहोचवत असतात. ज्ञानप्राप्तीनंतर जशी कर्माची चिंता उरत नाही, त्याप्रमाणेच जीवनामध्ये कर्मयोगाला जर आत्मज्ञानाची जोड दिली तर जीवन होते. जेव्हा मनुष्य आपले जीवनाचे मूळ ध्येय विसरतो, तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्या मूळ ध्येयाची पुनर्स्थापना करण्यासाठी अवतार घेतात. हा गीतेतील महत्त्वाचा विचार लक्षात घेण्यासारखा आहे. गीतेमध्ये ईश्वर, जीव, प्रकृती, काल आणि कर्म या पाच तत्त्वांचे महत्त्वाचे विस्तृत वर्णन आले आहे. पहिले चार तत्त्व जरी मानवी जीवन शक्तीच्या बाहेरील असले, मनुष्याने कर्ममार्गाचे आचरण करावे. ईश्वराने दिलेले नियत जीवनमान योग्य कर्म करून जीवन आनंदीत करण्यासाठी आहे. रडत बसण्यापेक्षा नियत कर्म करा, हा सिद्धांत जर सर्वांनी अंगीकारला, तर जीवनातील असंख्य प्रश्नांची उत्तरे आपोआपच सापडतात. हा गीता विचार सर्वांनी समजून घेणे ही काळाची गरज आहे.
 
 
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन|
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते ॥ २/४७
हा जीवनकर्म विचार केवळ एक विचार नसून ती आपल्याला भगवान श्रीकृष्णासारख्या प्रभूंनी दिलेला जीवनसुखमयतेचा महत्त्वाचा संदेश आहे. संत ज्ञानेश्वर माउलींनी कर्माची महती आपल्या ‘ज्ञानेश्वरी’मध्ये सांगितली आहे.
एरवी जग हे कर्माधीन |
ऐसि याची व्याप्ती गहन ॥ (ज्ञाने. ४/९२)
जग तुम्हाला कधीही लक्षात ठेवत नाही तर तुम्ही केलेल्या आठवत असते. मग ते कर्म तुम्हाला चांगले म्हणून ओळखतात किंवा वाईट म्हणून ओळखतात. त्यासाठी कर्म विचारच गीताई माउलीचा जीवन विचार आहे, असे या श्लोकातून ‘गीताई’ आपल्याला संदेश देत आहे.
 
 
यज्ञदानतपःकर्म न त्याज्यं कार्यमेव तत्|
यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्॥ (गीता १८/५)
Saint Awakening श्रीमद् भगवद्गीता ग्रंथ आनंदचिद्वन, ऐश्वर्याने परिपूर्ण चराचराने वंदन परम पुरुषोत्तम साक्षात भगवान श्रीकृष्णांची दिव्य वाणी आहे. अत्यंत रहस्याने भरलेली आहे. परमदयाळू श्रीकृष्णाच्या कृपेने जे पुरुष श्रद्ध आणि प्रेमळ विशुद्ध भक्तीने आपल्या अंत:करण भरून भगवद्गीतेचे मनन करतात, तेच या गीतेच्या स्वरूपाचे काही अंशी दर्शन घेऊ शकतात. म्हणून स्वकल्याण इच्छिणार्‍या स्त्री-पुरुषांनी भक्तश्रेष्ठ अर्जुनाचा आदर्श पुढे ठेवून स्वतःमध्ये अर्जुनासारखे दैवी बाणवून श्रद्धा भक्तिपूर्वक गीतेचे श्रवण, मनन, अध्ययन करावे आणि भगवंताचा खूप आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा.
 
- प्रा. डॉ. हरिदास आखरे
- ७५८८५६६४००
Powered By Sangraha 9.0