मुंबईत व्हॅनमध्ये सापडल्या 6.5 टन चांदीच्या विटा

    दिनांक :10-Nov-2024
Total Views |
- भरारी पथकाची कारवाई

मुंबई, 
Silver bricks in van : मुंबईतील विक्राेळीमध्ये एका कॅश व्हॅनमध्ये साडेसहा टन चांदीच्या विटा सापडल्या. पाेलिस व निवडणूक आयाेगाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. पकडलेल्या विटांचे मूल्य काेट्यवधींच्या घरात आहे. या चांदीच्या विटा मुलुंडमधील एका गाेदामात ब्रिंक्स या कंपनीच्या गाडीतून जात हाेत्या. विटा अधिकृत असल्याची माहिती समाेर आली. या प्रकरणी निवडणूक आयाेग, आयकर विभाग आणि पाेलिस अधिक तपास करीत आहेत.
 

silver 
 
Silver bricks in van : मुंबईत यापूर्वीही भुलेश्वरमध्ये 1.32 काेटी रुपयांचा मुद्देमाल सापडला हाेता. याप्रकरणी पाेलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले हाेते. शिवाय पुण्यात दाेन ठिकाणी पाेलिसांनी माेठे घबाड जप्त केले हाेते. पुण्यात राेकड नेण्यासाठी आराेपींकडून कारचा वापर करण्यात आला हाेता. मुंबईतील भुलेश्वर प्रकरणात पाच लाेक बॅग घेऊन जात हाेते. भुलेश्वरसारख्या वर्दळीच्या ठिकाणाहून लाेक कुठे जात हाेते, ही रक्कम कुणाची आहे, याचा तपास करण्यासाठी पाचही जणांना पाेलिस ठाण्यात आणण्यात आले हाेते. या प्रकरणात आयकर विभागाला पाचारण करण्यात आले. विधानसभेच्या निवडणुकीच्या ताेंडावर सातत्याने अशी राेकड सापडत असल्याने पाेलिसांनी चाेख बंदाेबस्त ठेवण्यास सुरुवात केली आहे.