कॅनडात हिंसाचाराच्या भीतीने मंदिरातील कार्यक्रम रद्द

    दिनांक :12-Nov-2024
Total Views |
- खलिस्तान्यांचे धमकी सत्र सुरूच
 
ओट्टावा, 
Canada violence : कॅनडामधील ब्रॅम्प्टन त्रिवेणी मंदिराने रविवारी भारतीय वाणिज्य दूतावासाचा जीवन प्रमाणपत्र वितरण समारंभ रद्द केला. स्थानिक पोलिसांनी खलिस्तान्यांनी दिलेल्या धमक्यांवर चिंता व्यक्त केल्याने हा निर्णय घेण्यात आला. ३ नोव्हेंबर रोजी खलिस्तानी समर्थकांनी ब्रॅम्प्टनमधील हिंदू सभा मंदिरातील कौन्सुलर कॅम्पवर हल्ला केला होता. तेव्हापासून हिंदूंना देण्याचे सत्र कायम राहिले आहे. ब्रॅम्प्टन त्रिवेणी मंदिराच्या वतीने १७ नोव्हेंबर रोजी भारतीय वंशाच्या हिंदू आणि शिखांसाठी आवश्यक जीवन प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ब्रॅम्प्टन त्रिवेणी कम्युनिटी सेंटरने सांगितले की, पील प्रादेशिक पोलिसांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
 
 
Brampton Triveni Temple
 
Canada violence : आम्ही या कार्यक्रमावर अवलंबून असलेल्या समुदायाच्या सदस्यांची माफी मागतो. ३ नोव्हेंबर रोजी खलिस्तानी समर्थकांनी ब्रॅम्प्टनमधील हिंदू सभा मंदिरातील कौन्सुलर कॅम्पवर हल्ला केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हिंसक संघर्षाचा निषेध केला. भारतीय मुत्सद्दींना धमकावण्याचा हा भ्याड प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले होते. यासोबतच त्यांनी कॅनडाच्या अधिकार्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले होते. दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारतीय एजंटांचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडा सरकारने केल्यानंतर गेल्या वर्षी दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. भारताने कॅनडा सरकारचे आरोप फेटाळून लावले आहेत.