विषय मार्गी लावणारा सुमित वानखेडे आमदार होणार : खा. बोंडे

13 Nov 2024 20:29:01
तभा वृत्तसेवा
तळेगाव (शा. पंत), 
Anil Bonde : सुमित वानखेडेंनी एखाद्या विषयाला हात घातला की तो विषयच मार्गी लागतो. सुमितमध्ये दूरदृष्टी, जिज्ञासा, चिकाटी आणि काम करण्याची अफाट उर्जा ठासून भरली आहे. सुमित वानखेडेंना दिलेले मत हे तुमच्या सर्वांगीण विकासाला जाईल असा विश्‍वास खासदार अनिल बोंडे यांनी व्यक्त केला.
 
 
hjhj
 
 
तळेगाव येथे 12 रोजी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी सुधीर दिवे, अंकिता होले, रमजान अन्सारी, वरुण पाठक, रोमी भिंडर, सुरेश नागपुरे, नयनसुख लढ्ढा, प्रशांत काकपुरे, सचिन होले, हेमलता भगत, हिना कोंडुलकर, गुणवंत नरंगे, मुस्ताक पठाण, ज्ञानेश्वर बाबरे, हरीदास तुंमडाम, रूपेश बोबडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
यावेळी सुधीर दिवे म्हणाले की, आर्वीचा विकास झाला नाही. मग पुन्हा 40 वर्षानंतर त्याच घराण्यामध्ये आमदारकी चा अट्टाहास का? लाडक्या बहिणींना महिण्याकाठी 1500 रुपये मिळतात म्हणून विरोधकांना पोटदुखी होते. आपल्याला सोयाबीन एकरी 5 पोतेही होत नाही. प्रचाराला आलेल्या सुप्रिया सुळे यांना एका एकरात 2 कोटींची वांगे कशी काय झाली असा सवाल त्यांनी केला. गरीबीची जान नसणारे लाडकी बहीणींना मिळणार्‍या पैशाची किंमत काय कळणार. उद्योग न आणून विधानसभेत बेरोजगारी हे यांचेच पाप असल्याचा घणाघात दिवेंनी केला.
 
 
उमेदवार सुमित वानखेडे यांनी खासदारकी असुनही मतदारसंघासाठी काही केले नाही आणि पत्नीच्या प्रचारासाठी वनवन फिरत आहेत. यांनी भुतकाळात काय केले सांगायला काही नाही अन् भविष्यात काय करणार हेही सांगायला काही नाही असा टोला वानखेडे यांनी लगावला. माझ्या जाहीरनाम्यात नमुद एक अन् एक विकास कामे केलेली आहे तेही फक्तसहा महिन्यात! पाच वर्षाचा कालावधी मिळाला तर आर्वी विधानसभेच्या विकास कामांचे पुस्तक होईल. ज्याला जे जमते ते करू दिले पाहिजे. घरातच पदाचा अट्टाहास का? असा सवाल वानखेडे यांनी केला.
 
 
कार्यक्रमाला तळेगाव पंचक्रोशीतील लाडक्या बहिणी, मतदार, भाजपा, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0