घुसखोरी प्रकरणी दोन बांगलादेशींसह चार जणांना अटक

    दिनांक :13-Nov-2024
Total Views |
- ईडीची कारवाई
 
रांची,
Bangladeshi infiltration case : झारखंडमध्ये बांगलादेशी घुसखोरी व ‘मनी लाँड्रिंग’ प्रकरणाशी संबंधित छापेमारीदरम्यान अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने दोन बांगलादेशींसह चार जणांना अटक केली. यात महिलेचाही समावेश आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी बुधवारी दिली. अटक केलेल्यांतील रॉनी मंडल आणि समीर चौधरी हे बांगलादेशी आहेत, तर पिंटू हलधर हा भारतीय आहे. पिंकी बासू मुखर्जी नावाच्या महिलेलाही अटक करण्यात आली.
 
 
ED dskl;
 
Bangladeshi infiltration case : बांगलादेशी घुसखोरी प्रकरणात भारतातील बेकायदेशीर मानवी तस्करी प्रकरणी पश्चिम बंगालमधून या तिघांना मंगळवारी रात्री बेकायदेशीर सावकारी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. केंद्रीय तपास यंत्रणेने मंगळवारी या ‘मनी लाँड्रिंग’ प्रकरणांमध्ये पश्चिम बंगालशिवाय झारखंडमध्ये १७ ठिकाणी छापेमारी केली. छाप्यांदरम्यान बनावट आधार कार्ड, बनावट पासपोर्ट, बेकायदेशीर शस्त्रे, स्थावर मालमत्तेची कागदपत्रे, रोकड, दागिने, प्रिंटिंग पेपर आणि मशीन्स, आधार आयडी बनवण्यासाठी वापरलेला कोरा प्रोफार्मा जप्त करण्यात आल्याची माहिती ईडीने मंगळावारी दिली.