बँक ऑफ इंडियाचा ६२.७६ वार्षिक नफा

    दिनांक :13-Nov-2024
Total Views |
नागपूर,
Bank of India : बँक ऑफ इंडियाने वित्तीय वर्ष २५ च्या दुसर्‍या तिमाही करिता आपला नफा जाहीर केला. तसेच आपल्या तिमाहीत निव्वळ नफा ६३टक्के ने वाढून वित्तीय वर्ष २०२५च्या तिमाही दोनमध्ये २,३७४ कोटी रु. तर वित्तीय वर्ष २०२४ च्या तिमाही दोनमध्ये १,४५८ कोटी रुपये होते. बँकेने दुसर्‍या तिमाही ५.७७ नवीन पीएमजेडीवाय खाती व वित्तीय वर्ष २०२५ मध्ये ९.५५ लाख नवीन खाती उघडली आहेत. एकूण व्यवहारांमध्ये डिजिटल व्यवहारांचा हिस्सा सप्टेंबर २०२३ मध्ये ९२टक्के वरून सप्टेंबर २०२४ मध्ये ९५टक्के वाढला. ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत बँकेच्या ५१९१ देशांतर्गत शाखा आहेत.
 
 
Bank of India Logo
 
Bank of India : निव्वळ एनपीए २९टक्के ने घटून रु.२०० कोटी झाले. सप्टेंबर २३ मध्ये कोटी होते तर सप्टेंबर २४ मध्ये ५,६४९ कोटी आहे. याशिवाय कव्हरेज रेशो सप्टेंबर २०२४ मध्ये ९२.२२ टक्के होता. जागतिक उलाढाल वार्षिक १२.०५टक्के वाढून सप्टेंबर २०२३ मध्ये १२,४६,८७९ कोटी तर सप्टेंबर२०२४ मध्ये १३,९७,१०० कोटी रुपये झाले आहे. बँकेचे एकूण भांडवल पर्याप्तता गुणोत्तर १०० बीपीएसने सुधारले आणि ३०.०९.२०२३ रोजी १५.६३टक्के विरुद्ध रोजी १६.६३टक्के झाले. सप्टेंबर२०२४ मध्ये रॅम अ‍ॅडव्हान्स १९.७४ टक्के ने वाढून ३,००,४१२ कोटी झाले असून सप्टेंबर २०२४ पर्यंतच्या ऍडव्हान्सच्या ५७.७०टक्के आहे. सप्टेंबर२०२४ मध्ये किरकोळ कर्जे २१.६१टक्के वार्षिक वाढ झाली. सप्टेंबर२०२४ मध्ये कर्ज २१.४६ टक्के नी वाढून १,२१,५१७ कोटी रुपये झाले.