लाडकी बहीण योजनेचा महिलांना आर्थिक आधार

    दिनांक :13-Nov-2024
Total Views |
- मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव
 
नागपूर, 
मध्यप्रदेशानंतर आता महाराष्ट्रातही लाडकी बहीण योजना लागू झाल्यामुळे राज्यातील सर्व महिलांना आर्थिक आधार मिळाला आहे. आगामी काळातही महिलांना आर्थिक दृष्टया सक्षम करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट प्रतिपादन मध्यप्रदेशचे CM Mohan Yadav मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केले. विधानसभेच्या निवडणूकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर सर्व भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारसभेसाठी ते नागपुरात असता अजनी येथील मुन्ना यादव यांच्या निवासस्थानासमोर आयोजित सभेत ते बोलत होते.
 
 
13nov5443
 
CM Mohan Yadav : ते पुढे म्हणाले, मध्यप्रदेशात गोवर्धन पूजेला शासकीय सुटी देण्यात आली आहे. यानंतर महाराष्ट्रातही सुटी दिल्या जाईल. लक्ष्मीपूजनाच्या दुसर्‍या दिवशी गोवर्धन पूजा साजरी करण्याची आपली परंपरा आपण सर्वांनी कायम राखली आहे. याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून आणि तेथील प्राण्यांचे भगवान इंद्राच्या कोपापासून संरक्षण केले होते. त्यामुळे हा दिवस आपण सर्वांनी आनंदाने साजरा करावा,यासाठीच शासकीय सुटी देण्यात आली आहे.
 
 
काँग्रेसचे नेते कोमात गेल्यासारखे वागतात
आगामी काळात श्रीकृष्ण जन्मस्थळांसोबतच इतर सर्व धार्मिक स्थळांचा तीर्थ स्थळ म्हणून विकास केल्या जाणार आहे. त्याचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. वर्षानंतर अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर बांधल्यामुळे काँग्रेसचे नेते कोमात गेल्यासारखे वागत आहे. भारतीय नागरिकांचे धार्मिक श्रध्दास्थळ असलेल्या अनेक शहराचा काँग्रेसने विकास केलाच नाही. मात्र आम्ही सर्व धार्मिक स्थळांचा सर्वांगिण विकास करण्याचे ठरविले असून त्यादृष्टीने वेगाने कामास लागलो आहोत.
 
 
ही आघाडी नव्हे तर महाबिघाडी
संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना राजकारणापासून दूर पाप काँग्रेसने केले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झाल्यानंतर आनंद साजरा करणारे हेच काँग्रेसचे नेतेमंडळी महाविकास आघाडी करीत जनतेला खोटे आश्वासन देत आहे. ही आघाडी नव्हे तर महाबिघाडी जनतेच्या हितासाठी नसल्याने काँग्रेसला मतदारांनी त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन CM Mohan Yadav मोहन यादव यांनी केले.