- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार
मुंबई,
मराठवाड्यातील या पिढीने दुष्काळ पाहिला, पण पुढच्या पिढीला मी दुष्काळ पाहू देणार नाही. पश्चिमी वाहिन्यांचे समुद्रात वाहून ५४ टीएमसी पाणी मराठवाड्याच्या खोर्यात आणून इथला दुष्काळ कायमस्वरूपी संपवून टाकणार, असा निर्धार उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केला. नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे झालेल्या जाहीर सभेत फडणवीस बोलत होते. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपाचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे आणि मुखेड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. तुषार राठोड यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेला विरुपाक्ष महाराज, खा. अजित गोपछडे, विष्णुवर्धन रेड्डी, चैतन्य बापू देशमुख, देविदास राठोड आदी उपस्थित होते.
Devendra Fadnavis : फडणवीस म्हणाले की, मराठवाड्याच्या खोर्यात पश्चिमी वाहिन्यांचे पाणी आणण्याचा निर्णय आपल्या सरकारने २०१९ मध्येच घेतला होता. मात्र, त्यानंतर आलेल्या महाभकास आघाडी सरकारने आपली योजना गुंडाळून ठेवली होती. पुन्हा आपले सरकार सत्तेवर आल्यानंतर या सगळ्या मंजुर्या देत निविदाही काढल्या. पुढच्या काळात वाहून जाणारे पाणी थेट मराठवाड्याच्या खोर्यात येईल आणि दुष्काळ कायमस्वरूपी संपुष्टात येईल. महायुती सरकारच्या काळात सिंचन योजनांची अनेक कामे झाली. आमदार डॉ. तुषार राठोड हे लेंडी योजनेचे काम घेऊन आले, त्यांना १६५ कोटी रुपयांचे पॅकेज दिले. अशा अनेक योजना राबवत आपल्याला या चेहरामोहरा बदलून टाकायचा आहे. डॉ. तुषार राठोड यांना यावेळी निवडून दिले, तर त्यांना आमदार ठेवणार नाही तर मंत्रिपद दिले जाईल. त्याचप्रमाणे डॉ. संतुकराव हंबर्डे आल्यावर दिल्लीत जातील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना सर्व प्रकारची मदत करतील, असेही फडणवीस यांनी नमूद केले .