भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे पाकिस्तान हादरला

13 Nov 2024 16:14:59
Earthquake in Pakistan भूकंपाच्या जोरदार धक्क्याने पाकिस्तान हादरला आहे. पाकिस्तानच्या वेळेनुसार सकाळी १०.१३ वाजता अनेक प्रांतात जमीन थरथरू लागली. यामुळे, लोकांमध्ये दहशत निर्माण झाली. राजधानी इस्लामाबादसह देशाच्या अनेक भागात बुधवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्यामुळे, लोकांमध्ये दहशत निर्माण झाली. पाकिस्तानच्या विविध भागात ५.३ तीव्रतेचा भूकंपाचा झटका आला. ही माहिती देताना देशाच्या हवामान खात्याने सांगितले की, भूकंपामुळे जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. ‘युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे’ (USGS) नुसार, भूकंपाची तीव्रता ५.१ इतकी होती. पाकिस्तान हवामान विभाग (PMD) ने त्याची तीव्रता ५.३ नोंदवली आहे.
 
 
pakistan
 
 
इस्लामाबादमधील Earthquake in Pakistan नॅशनल सिस्मॉलॉजिकल मॉनिटरिंग सेंटरच्या म्हणण्यानुसार, "भूकंपाचे केंद्र अफगानिस्तान मध्ये हिंदुकुश पर्वत शृंखला २२० किलोमीटर खोलीवर होते." भूकंपानंतर लोक घाबरून घराबाहेर पडले. मात्र अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. खैबर-पख्तुनख्वा, इस्लामाबाद आणि पंजाबच्या विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाकिस्तानात वारंवार भूकंप होत असतात. २००५ मध्ये झालेल्या भीषण भूकंपात ७४,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
Powered By Sangraha 9.0