अर्जुनी मोर,
Eng. Rajkumar Badole : अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाठी व महायुतीचे हात मजबूत करण्यासाठी महायुतीचे राष्ट्रवादी कांग्रेसचे (अजीत पवार) उमेदवार ईंजि. राजकुमार बडोले यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन तालुका भाजपा अध्यक्ष विजय कापगते यांनी केले. ते तालुक्यातील भाजपाच्या बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख तथा सर्व आघाडी प्रमुखांच्या प्रचार बैठकीत बोलत होते.
राजकुमार बडोले भाजपाचे असले तरी वरिष्ठ स्तरावरून झालेल्या निर्णयाने राजकुमार बडोले राष्ट्रवादी काँग्रेसच्या घडी चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. लोकांमध्ये कमळ आणि घडी चिन्हाबद्दल जो संम्रभ निर्माण झाला होता तो आता दूर झाला आहे. राजकुमार बडोले हेच महायुतीचे उमेदवार आहेत. Eng. Rajkumar Badole भाजपाच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांने कोणताही शंका न बाळगता बडोलेंना निवडून आणण्यासाठी काम करावे, असे आवाहनही कापगते यांनी यावेळी केले. मतदारसंघात बडोलेंच्या गावभेटी, पदयात्रा, रॅली, नुक्कड सभांना जनतेचा उत्तम प्रतीसाद मिळत असून त्यांच्याबद्दल नागरिकांत निर्माण झालेली सहानुभुती व आपुलकी पहाता त्यांचा विजय निश्चीत मानला जात आहे. असे असताना कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये, त्यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी व बहुमतांनी निवडून आणण्यासाठी सर्वांनी कसोशीने काम करण्याचे आवाहन विजय कापगते यांनी केले. बैठकीला भाजपाचे बुथ प्रमुख, शक्ती केंद्र, सर्व आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.