वन विकसित करणारा राज्यातला पहिला श्रेष्ठ नेता मुनगंटीवार !

अशा गुणी नेत्याला विजयी कराः नितीन गडकरी

    दिनांक :13-Nov-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर, 
Maharashtra Assembly Elections 2024 तब्बल 50 कोटी वृक्ष लावून पर्यावरण संवर्धनात अत्यंत महत्त्वाचे योगदान देणारा राज्यातील पहिला श्रेष्ठ नेता सुधीर मुनगंटीवार असून, त्यांनी तब्बल 50 कोटी झाडे लावून वन विकसित केले आहे. विकासाच्या बाबतीतही महाराष्ट्रातील पहिल्या पाच नेत्यांमध्ये ते अगे्रसर आहेत. अशा गुणी नेत्याला आपण प्रचंड बहुमताने निवडूण द्यावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शक्तीनगर येथील जाहीर सभेत केले.
 
 

sudhir mungantiwar 
 
 
Maharashtra Assembly Elections 2024 बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमदेवार तथा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनंंटीवार यांच्या प्रचारार्थ बुधवार, 13 नोव्हेंबर रोजी दुर्गापूरच्या शक्तीनगरातील गणेश मैदानावर नितीन गडकरी यांची जाहीर सभा पार पडली. मंचावर गडकरी यांच्यासह सुधीर मुनगंटीवार, चंदनसिंग चंदेल, हरिश शर्मा, रामपालसिंग यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षाचे नेते उपस्थित होते. गडकरी म्हणाले, युरिया व पेट्रोलसारख्या वस्तूंच्या आयातीवर शासनाचा मोठा निधी खर्च होतो. विदर्भातील 60 ते 70 टक्के खनिज संपत्ती एकट्या चंद्रपूर व गडचिरोलीत आहे. याचा उपयोग करीत मिथेनॉल व डीएबीच्या उत्पादनासाठी माझ्या व मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनी वेकोलिने पुढाकार घेतला आहे. लवकरच या भागात उद्योग सुरू होईल आणि रोजगारही वाढेल. घुग्गुसजवळून 11 किलोमिटरचा जोडरस्ता करून संस्कृती महामार्ग चंद्रपूरला जोडला जाणार आहे. त्यालाच पुढे वाढवत चंद्रपूरचा वळण रस्ताही करावा यासाठी मी प्रयत्न करेल, असे आश्वासन गडकरी यांनी यावेळी दिले.
 
Maharashtra Assembly Elections 2024  मी सहा निवडूक जिंकल्या, ही सातवी आहे. माझ्या पहिल्या निवडणुकीपासूनच नितीन गडकरी माझ्या प्रचाराला येतात आणि मी जिंकतो. याही वेळी तेच होणार आहे. पहिल्या वेळी मला उमेदवारी मिळू नये यासाठी प्रयत्न झाले पण तेव्हा नितीनजी पाठीशी उभे राहिले होते, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. काँगे्रसवाले विचारतात, मी कोणता विकास केला. अरे, ज्या विश्रामगृहात तुम्ही बसता, ज्या रस्त्यांवर तुम्ही प्रवास करता, ज्या तहसिल कार्यालयात तुम्ही मिरवता, किंबहुना जे पाणी तुम्ही पिता ती योजनाही मीच तयार केली आहे. तुम्ही केवळ जातीचे विष पेरले आहे, असा टोलाही काँगे्रसी नेत्यांना मुनगंटीवार यांनी लगावला.
इरई धरणावर वॉटरपोर्ट व्हावे
 Maharashtra Assembly Elections 2024 चंद्रपूरच्या विमानतळाचा प्रश्न वनांमुळे प्रलंबित आहे. त्यास दुसरा पर्याय म्हणून येथील इरई धरणावर वॉटरपॉर्ट करता येईल. 22 जणांना घेऊन जाणारे विमान उतरू पाण्यावर उतरेल. मी या प्रयोगाचा जनक असल्याने मी मुनगंटीवार यांना मार्गदर्शन करेल, असेही गडकरी म्हणाले.