बकाने विकासाचा नवा अध्याय लिहितील : भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे

13 Nov 2024 20:24:36
तभा वृत्तसेवा
देवळी, 
Maharashtra Election : देवळी विधानसभा मतदार संघातील मतदार एकाच व्यक्तीला पाच वेळा मतं देऊन कंटाळले आहेत. पाच वेळा निवडून आल्यानंतरही देवळीत विकासाची बोंब आहे. देवळीला आता विकास कामं करणार्‍या नेत्याची गरज आहे. तुम्ही राजेश बकाने यांना विजयी करा ते विकासाचा नवीन अध्याय लिहितील, असा विश्‍वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व्यक्त केला.
 
 
jk
 
 
 
महायुतीचे उमेदवार राजेश बकाने यांच्या प्रचारार्थ आज 13 रोजी आंजी मोठी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे गटनेते, आ. प्रवीण दरेकर, माजी खा. रामदास तडस, भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, महायुतीचे उमेदवार राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस, सुधीर दिवे, गणेश इखार, शरद सहारे, विजय आगलावे, अर्चना वानखेडे, राहुल चोपडा, मिलिंद भेंडे, जयश्री गफाट, जगदीश सांचेरिया, दीपक बावणकर, किरण उरकांदे उपस्थित होते.
 
 
आ. बावनकुळे पुढे म्हणाले की, महायुतीचे सरकार राज्यात पुन्हा येणे आवश्यक आहे. शेतकर्‍यांची शेती वीज मुक्त, घरगुती वीज बिलात 30 टक्के सवलत, लाडक्या बहिणींना प्रती महिना 2100 रुपये, शेतकर्‍यांना कर्ज मुक्त व्हायचे असेल तर राजेश बकाने यांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही निशाणा साधला. काँग्रेस पक्ष विचित्र असल्याचेही ते म्हणाले. प्रवीण दरेकर यांनी राजेश बकाने यांना आमदार करण्याचे आवाहन केले. माजी खासदार तडस यांनी आ. रणजित कांबळे यांच्या 25 वर्षाच्या कार्यकाळात देवळी विधानसभा मतदार संघाचा विकास होऊन शकला नाही. बकाने यांना महायुतीने उमेदवारी दिली. आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी बकाने यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी सुनील गफाट, सुरेश वाघमारे यांनी बकाने यांना आपण आशीर्वाद देण्याचे आवाहन केले. उमेदवार राजेश बकाने यांनी विकास काय असतो ते आपल्या कामातून दिसुन येईल. त्यासाठी एकदा संधी देण्याचे आवाहन केले. याप्रसंगी गणेश इखार, विजय आगलावे यांनी बकाने यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
Powered By Sangraha 9.0