नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा: प्रजित नायर

13 Nov 2024 19:49:41
गोंदिया, 
Prajit Nair : लोकशाही बळकट करण्यासाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत जागरुक व सुजान नागरिक म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले. जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी 11 ते 13 नोव्हेंबर पर्यंत जिल्हाभरात महाबाईक रॅलीद्वारे मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 
 
HJH
 
 
आज, 13 नोव्हेंबर रोजी नविन प्रशासकीय इमारतीसमोर महाबाईक रॅलीचे समापन करण्यात आले, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, पोलिस अधीक्षक गोरख भामरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी किरण अंबेकर, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, मुख्याधिकारी संदिप चिद्रवार, स्वीपचे सहायक नोडल अधिकारी डॉ. महेंद्र गजभिये व शिखा पिपलेवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, गटविकास अधिकारी आनंद पिंगळे प्रामुख्याने उपस्थीत होते. नायर पुढे म्हणाले, लोकशाही प्रणालीत निवडणूक हा महत्वाचा घटक आहे. निवडणूक प्रक्रियेत मतदार हा राजा असतो. त्यामुळे विधानसभेच्या निवडणूकीत नारिकांनी आपला मतदानाचा हक्क अवश्य बजवावा.
 
 
 
एम.मुरुगानंथम म्हणाले, जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप सेल अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून यातंर्गत महाबाईक रॅलीद्वारे मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या महाबाईक रॅलीत 13 हजार बाईकर्सनी जिल्हाभर फिरुन एकूण 408 कि.मी. भ्रमण केले. यामध्ये 6 हजार अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश होता. त्यांनी 70 ठिकाणी मतदार जागृती करण्यात आली. गोरख भामरे म्हणाले, मतदान हा आपला अधिकार आहे. या अधिकाराचा वापर करुन येत्या 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदान करुन लोकशाही बळकट करावे. कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0