महाराष्ट्रातील सत्ता देशाला दिशा देईल : सचिन पायलट

* महाविकास आघाडीचे कांबळे यांची प्रचारार्थ सभा

    दिनांक :13-Nov-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुलगाव, 
Sachin Pilot : महायुती सरकारच्या रिपोर्ट कार्डमध्ये काहीच नाही. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर योजना जाहीर केल्या. रणजित कांबळे यांना निवडून आल्यावर चांगली जबाबदारी दिल्या जाईल. शेतकर्‍यांची गोष्ट करणारा दिल्ली, मुंबईमध्ये कोणीच उरले नाही. या मतदार संघात भाजपा आणि काँग्रेसमध्ये लढत आहे. अपक्षांना ताकद पुरवली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसला विजयी करून देशाला दिशा द्या, असे आवाहन राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केले.
 
 
jkjk
 
 
देवळी विधानसभा मतदार संघातील महायुती काँग्रेसचे उमेदवार आ. रणजित कांबळे यांच्या प्रचारार्थ आज 13 रोजी स्थानिक सर्कस मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
 
 
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक निर्णायक आहे. देशाचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रात चुकीचे राजकारण झाले आहे. पार्ट्या तोडल्या, भाजपा डबल इंजिन सरकार म्हणते मात्र इंजिन असे आहे की ते फक्त धूर फेकत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करू म्हटले पण प्रत्यक्षात झाले नाही. योगीजी बटोगे तो कटोगे म्हणतात. त्यापेक्षा शिक्षण व इतर मुद्यावर बोलले पाहिजे. पढोगे तो बढोगे हा नारा दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.
 
 
चार तास उशिरा सुरू झालेल्या सभेत जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आशिष पांडे, माजी जिल्हाप्रमुख प्रशांत शहागडकर, रमेश सावरकर, शिरीष गोडे, अमरावतीचे राजेंद्र गवई, खा. अमर काळे, आ. रणजित कांबळे यांनीही मार्गदर्शन केले.