प्रचाराच्या रणधुमाळीत शेतकर्‍यांसाठी सरसावले मुनगंटीवार

*नुकसानग्रस्त धान उत्पादकांना आर्थिक मदत करा *प्रधान सचिवांसह निवडणूक आयोगाला दिले पत्र

    दिनांक :13-Nov-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर, 
Sudhir Mungantiwar : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर सभा, रॅली, प्रत्यक्ष भेटींमध्ये व्यस्त असताना शेतकर्‍यांप्रती त्यांची संवेदनशीलता त्यांनी जपली आहे, याची प्रचिती धान उत्पादक शेकर्‍यांसाठी लिहिलेल्या पत्रावरून आली आहे.
 
 

chandrpur 
 
 
मुनगंटीवार यांनी कृषी विभागाच्या प्रधान सचिवांना आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना पत्र लिहून धान उत्पादकांच्या समस्येचे गांभीर्य लक्षात आणून दिले आहे. धान पिकावरील मावा व घाटे अळी रोगामुळे शेतकर्‍यांचे झालेले नुकसान व भविष्यात होवू शकणारे नुकसान याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याबाबत व आर्थिक सहाय्य करण्याच्या सूचना त्यांनी या पत्रात दिल्या आहेत.
 
 
जिल्ह्यात हजारो शेतकरी धानाची शेती करतात. धान हेच त्यांचे मुख्य पीक असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील, विशेषतः मुल, पोंभुर्णा, बल्लारपूर तालुक्यातील धान पिकावर मावा या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यात घाटे अळीचे प्रमाणदेखील जास्त दिसून येत आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यासंदर्भात तात्काळ उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. या धान उत्पादकांना आर्थिक मदत मिळण्यासाठी आपण तातडीने संबंधिताना आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. या पत्राची प्रत चंद्रपूरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी तसेच चंद्रपूर जिल्हा कृषी अधिक्षकांना देखील पाठविण्यात आली आहे.
 
शेतकर्‍यांसाठी सदैव तत्पर
 
 
मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात शेतकर्‍यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पीक विम्याची विक्रमी 202 कोटीची रक्कम मिळू शकली. शेतकर्‍याच्या धानाला 20 हजार रुपये हेक्टरी बोनस देऊन भात उत्पादक शेतकर्‍याला न्याय देण्याचे काम त्यांनी केले. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात 1500 रूपये देण्यात येत आहेत. जिल्ह्यातील 4 लाख 72 हजार लाडक्या बहिणीला लाभ मिळावा यासाठी त्यांनी विशेष श्रम घेतले.