काँग्रेसच्या आर्थिक धोरणामुळे कर्नाटक दिवाळखोरीत

    दिनांक :13-Nov-2024
Total Views |
-खासदार सूर्या यांचा आरोप
 
मुंबई, 
काँग्रेस सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे कर्नाटक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. दक्षिणेकडील राज्य गंभीर आर्थिक अस्थिरतेचा सामना करीत आहे, असा आरोप भाजयुमोचे अध्यक्ष आणि खासदार Tejashwi Surya तेजस्वी सूर्या यांनी केला. ते बुधवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात बोलत होते. कर्नाटकमध्ये काँग्रेसने तयार केलेले हे एक बेजबाबदार आर्थिक मॉडेल राज्य आता दिवाळखोरीच्या आणि आर्थिक अराजकतेच्या उंबरठ्यावर उभे आहे. सार्वजनिक निधीच्या सरकारच्या हाताळणीमुळे आर्थिक संकट निर्माण होत आहे, असे तेजस्वी सूर्या यांनी मुंबईत पत्रकारांना सांगितले.
 
 
Tejashwi Surya
 
Tejashwi Surya : मागील भाजपा सरकारने कर्नाटकमध्ये २०,००० कोटी रुपयांचा महसूल वाढीचा अर्थसंकल्प सादर केला होता. तथापि, काँग्रेसचे बेशिस्त आर्थिक धोरण आणि चुकीच्या कारभारामुळे गेल्या दोन वर्षांत कोटी रुपयांची महसुली तूट झाली, असा दावा त्यांनी केला. काँग्रेस सत्तेवर निवडून आल्यास संभाव्य धोक्याबद्दल त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला सावध केले. महिलांना मासिक २,००० रुपये देण्याचे कर्नाटक सरकारने दिलेले आश्वासन अपूर्ण राहिले आहे, त्यामुळे लाभार्थींना अनिश्चित काळासाठी संप पुकारावा लागत असल्याचा दावाही तेजस्वी सूर्या यांनी केला. राज्य सरकारकडे विकासासाठी निधीच नाही. निवडणुकीपूर्वीच्या आश्वासनांमुळे अर्थसंकल्पीय अडचणींकडे त्यांनी लक्ष वेधले.

काँग्रेसाध्यक्षांच्या उपस्थितीत शिवकुमारांची कबुली
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी अलिकडेच मूलभूत पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी निधीची कमतरता असल्याचे मान्य केले होते. उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी दोनदा जाहीरपणे कबूल केले की, बंगळुरूमधील खड्डे बुजविण्यासाठी राज्याकडे पैसे नाहीत. शिवकुमार यांच्या शेजारी बसलेले काँग्रेसचे मल्लिकार्जुन खडगे यांनीही ही चिंता मान्य केली, असा दावा Tejashwi Surya तेजस्वी सूर्या यांनी केला.