- दक्षिणेकडून नागपूरात येणार्या अनेक रेल्वे गाड्या रद्द
- ४८ रेल्वे गाड्या रद्द
- ११ रेल्वे गाड्या अंशत रद्द
- ६६ गाड्या इतर वळविल्या
- ९ गाड्यांच्या वेळेत बदल तर ३ नियमित
नागपूर,
Telangana Train : तेलंगणा मधील पेड्डापल्ली जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा मालगाडी रुळावरून घसरल्याने दक्षिणेकडून नागपूरात येणार्या ४८ रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. या रेल्वे अपघातामुळे दिल्ली-चेन्नई मुख्य रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली असून दोन्ही बाजूंच्या गाड्याही थांबवण्यात आल्या आहेत. याशिवाय मार्गे धावणार्या एक्स्प्रेस, सुपरफास्ट, पॅसेंजर आणि मालगाड्याही इतर मार्गावर ६६ गाड्या वळविल्या आहेत. तसेच विविध ठिकाणी अनेक रेल्वे गाड्या अडकल्या असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिली आहे.
मालगाडीचे ११ डबे रुळावरून घसरले
Telangana Train : मुख्यत: अनेक प्रवासी गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकावर ताटकळत राहावे लागले. मंगळवारी रात्री उशिरा आणि रामागुंडम दरम्यान लोहखनिज वाहतूक करणार्या मालगाडीचे ११ डबे रुळावरून घसरले. लोखंडी कॉइल घेऊन जाणार्या ही मालगाडी रुळावरून घसरल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. कर्नाटकातील बेल्लारी येथून उत्तर प्रदेशातील गाझियाबादकडे जाणारी ही मालगाडी पेड्डापल्ली जिल्ह्यातून जात असताना अचानक मोठा अपघात झाला. या अपघातामुळे दिल्ली-चेन्नई मुख्य रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प असून ११ रेल्वे गाड्या अंशत रद्द करण्यात आल्या आहेत. तर ९ गाड्यांच्या वेळेत बदल तर ३ नियमित रेल्वे गाड्या धावत असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
रेल्वेगाड्यांच्या प्रतिक्षेत दिवसभर मनसंताप
Telangana Train : काझीपेट-बल्हारशाह सेक्शनवरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून नागपूर मार्गे धावणार्या उत्तरेकडील भागांना देशाच्या दक्षिणेकडील भागाशी जोडणारा महत्त्वाचा रेल्वे मार्ग दोन्ही दिशेच्या गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून रेल्वेगाड्यांच्या प्रतिक्षेत प्रवाशांना दिवसभर मनसंताप सहण करावा लागला. रात्री उशिरापर्यंत रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांना मदत करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केले असून प्रवाशांना पाणी व खाद्यपदार्थांची व्यवस्था करुन दिली आहे.