गोंदिया,
Varsha Praful Patel : मतदार संघाच्या प्रगती, समृद्धीसाठी, महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी, युवकांच्या रोजगारासाठी आणि शेतकरी व शेतमजुरांच्या उत्थानासाठी महायुतीला साथ देत बहुमताने निवडून देण्याचे आवाहन वर्षा प्रफुल्ल पटेल यांनी केले. त्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांच्या प्रचारासाठी गोरेगाव तालुक्यातील ब्राम्हणी येथे आयोजित सभेत बोलत होत्या. वर्षा पटेल यांनी लोकांना आवाहन केलं की, येत्या 20 तारखेला जास्तीत जास्त मतदान करा आणि महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या, जेणेकरून सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवता येईल. त्यांनी महिलांच्या आत्मनिर्भरतेवर विशेष लक्ष देण्याचे आश्वासन दिले. युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी, शेतकरी व शेतमजुरांच्या कल्याणासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचे त्या म्हणाल्या. वर्षा पटेल यांनी यावेळी महायुती सरकारच्या विकास कार्यांविषयी सविस्तरपणे चर्चा केली आणि या कामांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महायुतीचे सरकार स्थापन होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी केवल बघेले, कल्पना बहेकार, माया चौधरी, गीता बिसेन, प्राची ठाकूर, बेबी परिहार, कल्पना शेवटे, श्रद्धा रहांगडाले, ललीता पुंडे, शशी ताराम, वंदना पटले, भारती बिसेन, सुशीला कटरे, वर्षा वैद्य, खिलेश्वरी परिहार, कल्पना गजभिये, हौशीला मडावी, रितू बिसेन, गीता भलावी, मेसंधी मेश्राम, सीमा बिसेन, संगीता बिसेन, बाबा बोपचे, बाबा बहेकार, लालचंद चव्हाण, पराग चौधरी, सुरेंद्र रहांगडाले, रमेश बिसेन, नीलकंठ गौतम, उमेश बिसेन, तिलक कटरे, उमेंद्र बिसेन, प्रल्हाद बिसेन, राजेंद्र बिसेन, सुखदेव कटरे, पराग चौधरी, यशपाल पटले, भारत भलावी, ओमकार भलावी, गोपाल भगत, देतराम पटले, अनिल गौतम यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.