actor pankaj tripathi पंकज त्रिपाठी यांनी हॉटेलमध्ये काम करतानाचे दिवस आठवताना एका मीडिया कार्यक्रमात किस्सा सांगितला. तो नुकताच त्याच हॉटेलमध्ये पोहोचला होता, जिथे त्याच्यासोबत असंच काहीसं घडलं होतं...
आपल्या कामाच्या आणि प्रतिभेच्या जोरावर बॉलिवूडमध्ये नाव कमावणारा अभिनेता पंकज त्रिपाठीचा संघर्ष खूपच रंजक आहे. अभिनयात येण्यापूर्वी पंकज बिहारमधील पटना येथे एका हॉटेलमध्ये काम करायचे. ९० च्या दशकात ते पटना येथील मौर्या हॉटेलमध्ये किचन सुपरवायझर म्हणून काम करायचे. 'अंधा कानून' हा चित्रपट पाहिल्यावर त्याचं अभिनयावरचं प्रेम या काळात वाढल्याचं तो सांगतो.
अलीकडेच, पंकजने त्याच्या जुन्या हॉटेलमध्ये काम करत असतानाचे दिवस आठवताना एक प्रसंग सांगितला. त्याने हे देखील सांगितले की, आजही तो त्या हॉटेलमध्ये काम करत असलेल्या लोकांच्या संपर्कात आहे, पंकज नुकताच त्याच हॉटेलमध्ये पोहोचला होता, जिथे त्याच्यासोबत असे काही घडले ज्यामुळे, त्याला अश्रू अनावर झाले.
जेव्हा 'कालिन भैया' ओरडला
एका सार्वजनिक actor pankaj tripathi मीडिया कार्यक्रमात उपस्थित असलेले पंकज त्रिपाठी म्हणाले, 'या कार्यक्रमाला येण्यापूर्वी मी जवळपास १५ हॉटेल्सच्या कर्मचाऱ्यांना भेटलो जिथे मी आधी काम केले होते. मी तिथे विक्रांत मॅसीला भेटलो व तिथे उपस्थित असलेल्या सर्व स्टाफ सदस्यांनी त्यांना सांगितले की, मी त्यांच्यासोबत मी कसे काम करायचो.
हॉटेलचे दिवस आठवत तो म्हणाला, 'पूर्वी मी मागच्या दाराने हॉटेलमध्ये प्रवेश करायचो, आज तेथून हॉटेलचे बाकीचे कर्मचारी आत जातात.
आज त्याच हॉटेलच्या मेन गेटवरून मला एंट्री मिळाली आणि तिथे जर्नल मॅनेजर माझ्या स्वागतासाठी उभे होते. तो क्षण मला भावूक करून गेला. तर या सर्व आठवणी अचानक माझ्या डोळ्यांसमोर आल्या आणि त्यावेळी मला विश्वास झाला की, आयुष्यात काहीही शक्य आहे. कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाने तुम्ही तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करू शकता.
पंकज त्रिपाठी यांचा बॉलिवूडमधील प्रवास
पंकज त्रिपाठी actor pankaj tripathi यांचा बॉलीवूडमधला आतापर्यंतचा प्रवास अतिशय अद्भुत आणि प्रेरणादायी आहे.२००४ मध्ये आलेल्या 'रन' या चित्रपटात लोकांनी त्यांना पहिल्यांदा एक छोटीशी भूमिका करताना पाहिले.
त्यानंतर, त्याने अनेक चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका केल्या, मात्र 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटातून त्याच्या करिअरमध्ये मोठा बदल झाला. ज्यानंतर, त्याच्या कलेची जादू सर्वांना प्रभावित करून गेली आणि आज तो बॉलिवूडमधील प्रत्येक निर्माता आणि दिग्दर्शकाची पहिली पसंती आहे. अलीकडेच, तो या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट 'स्त्री 2' मध्ये देखील दिसला होता ज्यात सर्वांना त्याचे काम आवडले.