महाराष्ट्राची जनता याला बळी पडणार नाही !

13 Nov 2024 15:44:14
नागपूर,
vidhansabha elections 2024 तेलंगणाचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन साफ़ खोटे बोलतात . तेलंगणामध्ये काँग्रेसने दिलेल्या सहा गॅरेंटीपैकी एकही पूर्ण केल्या नाहीत असा आरोप केंद्रीय गृहराज्यमंत्री बंडी संजीव कुमार यांनी नागपूरमध्ये भाजपा मीडिया कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. महाराष्ट्रात महिलांना तीनहजार रुपये जाती गणना सारख्या योजनेच्या भूलथापा मविआ देत असून महाराष्ट्राची जनता त्यांना बळी पडणार नाही असे त्यांनी सांगितले.
campaign 
 
vidhansabha elections 2024 त्यावेळी हिमाचलचे भाजप प्रदेशाध्यक्ष डॉ. राजीव बिंदल आणि कर्नाटकमधील विधानसभेतील विरोधी पक्ष नेते नारायणस्वामी उपस्थित होते . बेरोजगारांना बेरोजगारी हफ्ता म्हणून चार हजार रुपये असो की महिलांना साठीच्या योजना असो एकही तेलंगणात पूर्ण झाल्या नाहीत . प्रति क्विंटल  धानपिकाला पाचशे रुपये अनुदान देखील दिले नाही आणि एमएसपीचा तर नावच नाही असा आरोप बंडी संजीव कुमार यांनी केला. कर्नाटक आणि तेलंगणामध्ये काँग्रेसने केलेल्या भ्रमनिरासामुळे हरियाणामध्ये लोकांनी भाजपला निवडून दिले आहे .महाराष्ट्रात महिलांना तीनहजार रुपये जाती गणना सारख्या योजनेच्या भूलथापा मविआ देत असून महाराष्ट्राची जनता त्यांना बळी पडणार नाही असे त्यांनी सांगितले. 
 
Powered By Sangraha 9.0