यावर्डीच्या विद्यार्थ्यांनी लिहिले वडिलांना पत्र

स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती उपक्रम

    दिनांक :13-Nov-2024
Total Views |
कारंजा लाड, 
vidhansabha elections 2024 विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २० नोव्हेंबर रोजी होणार आहेत. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डी येथील विद्यार्थ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक विजय भड यांच्या मार्गदर्शनात आपल्या वडिलांना मतदान जनजागृती करण्याकरिता पत्र लिहिले.
 
 

washim 
 
vidhansabha elections 2024 मतदान प्रक्रियेमध्ये मतदारांचा जागरूकपणे सहभाग वाढावा यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने स्विप हा २००९ मध्ये सूरू केलेला कार्यक्रम आहे. मतदान प्रक्रियेविषयी जागरूकता वाढावी, त्या प्रक्रियेचे ज्ञान प्रत्येक मतदारापर्यंत पोहचावे, मतदान प्रक्रियेत सामान्य मतदाराचा सहभाग वाढावा हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. २००९ मध्ये झारखंड राज्याच्या निवडणूकी पासून या कार्यक्रमाची सुरूवात झाली. या योजनेच्या कार्यान्वायासाठी वाणिज्यक संस्था, स्वयंसेवी संस्था, शिक्षण संस्था, प्रसारमाध्यमे यांचाही सहभाग घेण्यात येत आहे. जिल्ह्याच्या जिल्हा निवडणूक अधिकारी बुवनेश्वरी एस यांनी मतदान टक्केवारी वाढीवर भर दिला आहे.
 
vidhansabha elections 2024 त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डी येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी आकाश आहाळे, गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने, मुख्याध्यापक विजय भड यांचे मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी आपल्या वडिलांना पत्र लिहून मतदान करण्याचे आवाहन केले. मतदान जनजागृतीसाठी विद्यालयांमध्ये पत्रलेखनाचा उपक्रम शिक्षक राजेश शेंडेकर, गोपाल काकड, अनिल हजारे यांनी राबविला. विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना व इतर नातेवाईकांना पत्र लिहून मतदान करण्यासंदर्भात विनंती केली आहे. ही पत्र विद्यार्थ्यांनी आकर्षकपणे रंगविली व त्यावर मतदान जनजागृतीची घोषवाक्य सुद्धा लिहिलीत. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी शाळेचे शिक्षकेतर कर्मचारी देविदास काळबांडे, भालचंद्र कवाणे, राजेंद्र उमाळे, राजेश लिंगाटे उपस्थित होते.