प्रहार
- हितेश शंकर
मेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निर्णयानंतर Donald Trump डोनाल्ड ट्रम्प बहुमताने पुन्हा राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडून आले आहेत. हा त्यांचा दुसरा असेल. अमेरिकेचे नवीन निवडणूक निकाल (रिपब्लिकन लाट) भूतकाळातील काही अविस्मरणीय घटनांशी जोडलेले आहेत, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच एक अशी लाट जी गेल्या निवडणुकीत मोठ्या प्रयत्नाने दडपण्यात आली होती. उदाहरणार्थ, वामपंथी इकोसिस्टम’ने ‘डेमोक्रॅट्स’च्या बाजूने सुरू केलेले ब्लॅक लाईव्ज मॅटर’ अभियान एक खूप मोठे चक्र होते. तोंडदेखले त्याच्यात मानवी संवेदना आणि भक्कम तर्कही होते. या सगळ्यामुळे डाव्यांच्या बाजूने जोरदार हवा निर्माण झाली. पण हे विसरता कामा नये की या सर्व गोष्टी २० डॉलरच्या एका बनावट बिलावर आधारित होत्या. म्हणजेच एक बनावट ‘चळवळ’, अमेरिकेच्या निवडणुकांवर चीनचा प्रभाव असल्याच्या अफवा आणि तांत्रिक तिकडबबाजी करून ही लाट रोखण्यासाटी वामपंथी गोटातून सर्व प्रयत्न करण्यात आले. आपल्या मागील कार्यकाळात कमावलेल्या लोकप्रियतेमुळे, डोनाल्ड ट्रम्प हे सोशल मीडियावर ‘भारदस्त व उंच व्यक्तिमत्त्व’ होते आणि ‘पार्लर प्लॅटफॉर्म’वर ते खूप लोकप्रिय होते. मात्र, ट्रम्प विजयी झाल्याने डाव्यांच्या इकोसिस्टीमला मोठ्या प्रमाणात हादरा बसला आहे. शांतीऐवजी तथाकथित क्रांती आणि लोकशाहीपेक्षा अराजकतेला प्राधान्य देणार्या वामपंथी आघाडीने जगातील सर्वात जुन्या अस्थिर करण्यासाठी युद्धाचा चक्रव्यूह रचण्यात कोणतीही कसर सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आता बाजी पलटली असून या राजकीय खेळाला पुन्हा नवे वळण लागले आहे.
ताज्या निकालांमुळे परिस्थिती बदललेली दिसते. कारण वामपंथी ‘डेमोक्रॅट्स’कडून त्यांच्याच शैलीत Donald Trump डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील ‘रिपब्लिकन’ आघाडीने बदला घेतला आहे. कालपर्यंत डाव्यांच्या मुठीत बंद असलेला ‘पक्षी’ गेला आहे. सोशल मीडियाची शक्ती एलन मस्कसह ‘हत्ती’ बरोबर दिसून आली. एलन मस्क केवळ रिपब्लिकन पक्षातच सामील झाले असे नसून ट्रम्प यांचा दणदणीत विजय हा टि?टरभोवती कोंडाळे केलेल्या वामपंथी विचारसरणीच्या लोकांना देखील जबरदस्त धक्काच आहे. ट्विटरवर प्रभावशाली असलेले वामपंथी विचारवंत उघडउघड पक्षपातीपणा करीत होते. भिन्न विचारसरणींच्या पक्षांना अडथळे आणत मात्र, ट्विटरवरील या वामपंथी मुखंडांची मक्तेदारी साफ मोडून काढत हा विजय प्राप्त झाला आहे, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. डेटा क्रांतीच्या युगात, सोशल मीडिया आणि एआयच्या शिडीवर चढत असलेल्या तांत्रिक क्षेत्रातील दिग्गजांनी राजकीय पक्षपातीपणापासून मुक्त राहणे लोकशाहीच्या संरक्षणासाठी किती महत्त्वाचे आहे, हेच ट्रम्प यांच्या या विजयाने दाखवून दिले आहे.
ट्विटर) आता पूर्णपणे निःपक्षपाती आहे की त्याचा राजकीय कल एकीकडे झुकल्यामुळे एक प्रकारचा पक्षपातीपणा निर्माण होईल हा एक वेगळा वाद होऊ शकतो, परंतु हे स्पष्ट आहे की डाव्यांच्या तावडीतून सुटून निष्पक्ष होण्याच्या दिशेने सोशल मीडियाचे हे पहिले महत्त्वाचे पाऊल आहे.
Donald Trump : न्यूजरूम अर्थात प्रसार माध्यमांमध्ये डाव्यांची घुसखोरी हा एक जागतिक आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अराजकता पसरवणे आणि तथाकथित ‘फॅक्ट चेक’ च्या नावाखाली द्वेषाची जोपासना तसेच वामपंथी विचारसरणी आणि जिहादी एकत्रीकरण हा त्याचा नवा विस्तार आहे. नकारात्मकतेच्या या धोकादायक संयोगाने जागतिक संवादात नवीन आव्हाने निर्माण केली आहेत हे समजावून घ्यावे लागेल. खरे प्रगतिशील मुद्दे मांडणे ही आपली प्राथमिकता नव्हती आणि या सत्याचा डाव्या विचारसरणीच्या माध्यमांना स्वीकार करण्याशिवाय गत्यंतर नाही. याउलट माहितीतला निःपक्षपातीपणा आणि विविधता कमी करणे हाच त्यांचा एकमेव अजेंडा आहे.
जर हे केवळ राजकीय डावपेच असते तर कदाचित जगाने याकडे डोळेझाक केली असती. परंतु याचा परिणाम असा झाला आहे की समाजात एकतर्फी माहिती पोहोचत आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये विभाजन, भावना वाढू शकते.
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, ट्विटर (आता एक्स) सारख्या सोशल मीडिया कंपन्यांवर आरोप आहे की ते काही विशिष्ट विचारांचा, संकल्पनांचा प्रचार करून ‘वैश्विक नॅरेटिव्ह’ ला प्रभावित करीत आहेत. ट्विटरचे ‘एक्स’ मध्ये रूपांतर आणि एलन मस्क यांच्या नेतृत्वाखालील ट्विटरचा नवीन दृष्टिकोन हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. मस्क यांनी याकडे अभिव्यक्ती नवीन सुरुवात म्हणून पाहिले, जेथे सर्व विचारांना, कल्पनांना स्थान मिळेल. परंतु त्याच वेळी, अशी चिंता आहे की जर या निर्धारापासून ते ढळले तर चुकीची माहिती आणि द्वेषभावनेचा प्रसार होण्याचा धोका वाढू शकतो. जेव्हा डिजिटल प्लॅटफॉर्मचा समाजाच्या विचारांवर खोलवर प्रभाव पडतो अशा वेळी हे सामाजिक संतुलन खूप महत्त्वपूर्ण आहे.
आता Donald Trump ट्रम्प यांच्या विजयाच्या परिणामांबद्दलची चर्चा करू. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचा केवळ अमेरिकेवरच नव्हे, तर भारत आणि एकूणच हिंदूंवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात भारत-अमेरिका संबंध दृढ झाले आणि त्यांनी भारताला त्यांच्या मित्र राष्ट्रांंमध्ये महत्त्वाचे स्थान दिले. ‘हिंदूफोबिया’ला ट्रम्प यांचा स्पष्ट विरोध आणि ठाम भूमिका भारतासाठी महत्त्वाची आहे. ट्रम्प यांनी पाकिस्तानसारख्या देशांवर दबाव आणून त्यांचा दहशतवादाला आणि दहशतवाद्यांना असलेला पाठिंबा थांबवण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब हिंदू अस्मिता आणि भारतीय समुदायासाठी दिलासादायक होती.
Donald Trump : ट्रम्प यांच्या विचारसरणीशी हिंदू-अमेरिकन समुदायाला विशेष जवळीक वाटते. विशेषत: जेव्हा त्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा आदर केला, तेव्हा तर भारतीयांमध्ये ट्रम्प यांच्याविषयीचा आदर अधिकच वाढला. ‘हाऊडी-मोदी’ सारख्या कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत, तेथील सध्याचे नेतृत्व आणि हिंदू समुदायासोबत उभे असल्याचे संकेत दिले. शिवाय, ट्रम्प यांनी धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करीत बांगलादेशातील हिंदू समुदायावरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांबद्दल (जसे की मंदिरांवर हल्ले आणि हिंदूंवरील हिंसाचार) उघडपणे चिंता व्यक्त केली आहे. यांची कट्टरपंथी इस्लामविरुद्ध कठोर भूमिका जागतिक स्तरावर कट्टरतावाद आणि दहशतवाद रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
ट्रम्प प्रशासनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर या मुद्यांवर वचनबद्धता दर्शविल्यास, विश्वशांती आणि मानवतेसाठी त्याचे दूरगामी परिणाम होतील.
मात्र, ट्रम्प यांचा विजय डाव्या ‘इकोसिस्टम’साठी आव्हान ठरू शकतो. त्यांचे राष्ट्रवादी धोरण वामपंथी विचारसरणीच्या विरुद्ध आहे, ज्यात अराजकतेत परिवर्तित होणारा आणि लोकसंख्येच्या संतुलनातून लोकशाहीला प्रभावित करणारी घुसखोरी आणि सीमा सगळ्यांसाठी खुल्या करण्याचे समर्थन याच गोष्टी असतात. ट्रम्प यांचा ‘अमेरिका फर्स्ट’ दृष्टिकोन त्यांच्या प्रमुख सहयोगी देशांवर केंद्रित आहे, ज्यामध्ये भारताला महत्त्वाचे स्थान आहे.
चीनच्या संदर्भातही ट्रम्प यांचा विजय भारतासाठी फायदेशीर ठरू शकतो. चीनबाबत Donald Trump ट्रम्प यांच्या आक्रमक धोरणामुळे भारताला सामरिक/धोरणात्मक फायदा आहे. सीमेवरील तणावाच्या काळात ही कठोर भूमिका भारतासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरू शकते. शेवटी, ट्रम्प यांच्या विजयामुळे जागतिक स्तरावर भारत आणि हिंदू समुदायाला तार्किक आधार मिळू शकतो. ट्रम्प यांची राष्ट्रवादी आणि कट्टरपंथी विरोधी धोरणे वामपंथी ‘इकोसिस्टम’साठी आव्हानात्मक असली तरी भारतासाठी नवी दिशा उघडू शकतात. मात्र, हे विसरता कामा नये अमेरिकेची प्राथमिकता ‘अमेरिका फर्स्ट’ हीच आहे. परंतु ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या धोरणांमुळे भारत-अमेरिका संबंध अधिक मजबूत होतील, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. जगातील सर्वांत जुन्या आणि जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचे संघटन जागतिक इतिहासात एक नवा अध्याय लिहू शकते.