साप्ताहिक राशिभविष्य
मेष (Aries Zodiac): आर्थिक स्थिती मजबूत
Weekly Horoscope : आपला राशिस्वामी सुख स्थानात आहे. धनेश व सप्तमेश शुक्र भाग्यात असून चंद्र व गुरू धनस्थात आहेत. या ग्रहस्थितीमुळे हा आठवडा आपल्याला आर्थिक दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे आर्थिक विषयाशी संबंधित असलेले, महत्त्वाचे ठरणारे निर्णय लवकरात लवकर घेतले पाहिजेत. कामाची योग्य ती आखणी करणे व प्रलंबित कामे मार्गी लावणे फायद्याचे ठरेल. कुटुंब नातेवाईकांमध्ये सामंजस्य राखणे आवश्यक ठरेल. कोणीही दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्या. कोणताही मुद्दा प्रतिष्ठेचा करू नका. तडजोडीची भूमिका घेणे फायद्याचे ठरेल.
शुभ दिनांक - १७, १८, २१, २२.
वृषभ (Taurus Zodiac): सावध पावले उचलावी
आपला राशिस्वामी शुक्र अष्टम स्थानात असला, तरी त्या स्थानाचा स्वामी गुरू आपल्या राशीत असल्याने एक महत्त्वाचा निर्माण झाला आहे. चंद्र आपल्याच राशीतून या आठवड्याचे भ्रमण सुरू करीत आहे. या बव्हंशी शुभ ग्रहस्थितीमुळे या आठवड्यात बरेचसे चांगले व शुभकारक अनुभव आपल्याला लाभतील. तथापि, लाभ स्थान राहूमुळे बिघडल्याने भलत्या वेळी अडचणीत आणणारे प्रसंगदेखील उद्भवू शकतात. त्यामुळे अतिशय सावध व सतर्कपणे आपले वागणे असावयास हवे. नोकरी-व्यवसाय असो की काही, समोरची व्यक्ती विश्वासातली नसेल तर त्याच्यासमोर आपल्या योजना उघड करू नका.
शुभ दिनांक - १७, १९, २०, २२.
मिथुन (Gemini Zodiac): जेवढ्यास तेवढेच योग्य
Weekly Horoscope : आपला राशिस्वामी बुध षष्ठ स्थानात रवीसोबत आहे, तर व्ययेश शुक्र सप्तमातून राशीला पाहात आहे. व्ययातूनच चंद्र या आठवड्याचे भ्रमण सुरू करतोय. ही स्थिती पाहता आठवड्याची सुरुवात खर्चिक होऊन सप्ताहाच्या मध्यात काहीसा दिलासा मिळेल. साधारणतः आपल्या कलागुणांना उपयुक्त असा आठवडा आहे. मात्र, याचवेळी कुठल्या तरी बाबीचा बाऊ करीत आपला विरोधी-वर्ग काही गैरसमज, अफवा पसरविण्याचा प्रयत्न करू शकतो. आपणदेखील एखाद्या मोहाला बळी पडून नसते झेंगट स्वतःमागे लावून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सावध राहा. सामाजिक, राजकीय जेवढ्यास तेवढेच राहावयास हवे.
शुभ दिनांक - १८, १९, २०, २१.
कर्क (Cancer Zodiac): मनाचे संतुलन राखा
आपला राशिस्वामी चंद्र या आठवड्याच्या प्रारंभी लाभ स्थानात गुरूसोबत आहे तर आपल्या राशीत मंगळ असून तो व्यथित आहे. आपल्या राशीवर कोणत्याही शुभग्रहाची दृष्टी नाही. ही ग्रहस्थिती पाहता या आठवड्यात कोणत्याही कार्यक्रमाची रूपरेषा ठरवताना सार्या बारकाईने लक्ष ठेवावयास हवे. काही गोष्टी मनासारख्या न घडल्याने त्याचा त्रास होईल. काहींच्या बाबतीत आरोग्यासंबंधीचे त्रास उद्भवू शकतात. अशात मनाचे संतुलन ढळू देऊ नका. आठवड्याच्या उत्तरार्धात चंद्र स्वराशीत आल्यावर काही चांगल्या घटना सुखावून जातील. कोणतीही अडचणदेखील निर्माण होणाची शक्यता नाही, हे ही नसे थोडके.
शुभ दिनांक - १७, २०, २३.
सिंह (Leo Zodiac): नोकरी-व्यवसायात मंदी
Weekly Horoscope : आपला राशिस्वामी रवी चतुर्थात बुधासोबत असून रवीवर व आपल्या राशीवर शनीची दृष्टी आहे. चंद्र दशमातून या आठवड्याचे भ्रमण सुरू करीत आहे. ही स्थिती प्रामुख्याने आरोग्याच्या बाबतीत फारशी सुखावह नाही. काही मोठा आर्थिक फटकादेखील बसू शकतो. शनीच्या प्रभावाने नोकरी-व्यवसायात मंदीचे सावट आढळेल. कुटुंबात काही आजारपणे निर्माण होऊ मतभेद-वादविवाद यामुळे कुटुंबात तणाव राहण्याची शक्यता आहे. तो प्रयत्नपूर्वक दूर करावयास हवा. आर्थिक आघाडीवर असमाधानाचे चित्र राहू शकते. विशेषतः व्यापारी- व्यावसायिक वर्गाला हा आर्थिक फटका जाणवावा.
शुभ दिनांक - १८, १९, २२, २३.
कन्या (Virgo Zodiac): प्रलंबित कामांना गती
आपला राशिस्वामी बुध या आठवड्यात पराक्रम स्थानात रवीसोबत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र स्थानातून भ्रमण सुरू करीत आहे. आपल्या राशीत केतू असून त्याच्यावर गुरूच्या दृष्टीमुळे जणू वचक बसला आहे. ही स्थिती आपणास सुखद अनुभव देण्यास पुरेशी आहे. त्यामुळे या सप्ताहात कार्यकुशलतेने आपल्या योजना मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा, असे सुचवावेसे वाटते. आपली व्यग्रता वाढेल, मात्र त्यातून अंतिमतः फायदाच होईल. ही स्थिती आपणास कोणत्याही नाउमेद होऊ देणार नाही, हे मात्र नक्की. काहींना प्रवासाचे योग संभवतात.
शुभ दिनांक - १७, १८, १९, २१.
तूळ (Libra Zodiac): संधी दवडू नका
Weekly Horoscope : आपला राशिस्वामी शुक्र पराक्रम स्थानात आहे. आपल्या राशीवर धनेश मंगळाची दृष्टी आहे. चंद्र आपल्या अष्टम स्थानातून गुरूच्या साक्षीने या सप्ताहाचे भ्रमण सुरू करीत आहे. आठवड्याची सुरुवात काही आरोग्याबाबत कुरबूर निर्माण करणारी ठरू शकते. ते वगळता नोकरी, व्यवसाय, साहित्य, कला, संगीत, विज्ञान, संगणक वगैरे क्षेत्रातील मंडळींची अपेक्षित दिशेने घोडदौड सुरू राहणार आहे. काही लोकांना मंगळ काही धाडसी पावले उचलण्याची प्रेरणा देऊ शकतो. नोकरी-व्यवसायात कार्यक्षमता सिद्ध करण्याचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. कोणतीही संधी दवडू नका. व्यावहारिक लाभाचा विचार तिचा स्वीकार करावा.
शुभ दिनांक - १९, २०, २१, २२.
वृश्चिक (Scorpio Zodiac): अर्थभान ठेवणे आवश्यक
या सप्ताहातील अतिशय शुभ रास आपली ठरावी. आपला राशिस्वामी मंगळ भाग्य स्थानात आहे, तर राशीत रवी व बुध आहेत. राशीवर सुखेश शनीची दृष्टी आहे. धनस्थानी शुक्र विराजमान आहे. सप्तमातून गुरूची शुभ दृष्टी आहे व चंद्रही भ्रमण सुरू करीत आहे. शनी- मंगळाचा योग कार्यक्षेत्रात काही आकस्मिक परिवर्तन करण्यास कारणीभूत ठरू शकतो. आर्थिक विचार करता आवक वाढणार असली, तरी काहीसा खर्चिक असा हा आठवडा ठरू शकतो. आपल्याकडे येणार्या मोठेपणामुळे हुरळून जाऊन आपण खर्च करीत सुटणार असे दिसते. त्यामुळे अर्थभान ठेवणे आवश्यक आहे. काही मंडळी प्रवासाच्या योजना शकतात.
शुभ दिनांक - १९, २०, २१, २२.
धनु (Sagittarius Zodiac): नव्या दिशा गवसणार
आपला राशिस्वामी गुरू शुक्राच्या राशीत सहाव्या कर्म स्थानात असून आपल्या राशीत शुक्र आहे. हा अतिशय महत्त्वाचा शुभ योग सध्या आपल्या वाट्याला आला आहे. चंद्र षष्ठातून भ्रमण सुरू करीत आहे. ही ग्रहस्थिती आपली एकूणच वाटचाल सुस्थितीत सुरू असल्याची द्योतक विद्वान व प्रतिष्ठित माणसांमध्ये असलेली ऊठबस आपली योग्यता व क्षमता दर्शविणारी आहे. यातूनच या वाटचालीत काही नव्या दिशा गवसण्याची शक्यता आहे. नव्या परिचयातून काही महत्त्वाची कामे मार्गी लागण्याची शक्यता राहील. या सार्यात मात्र कोणाला जामीन राहण्याचा धोका पत्करू नका. कौटुंबिक गणित चांगले जमलेले राहील.
शुभ दिनांक - १८, १९, २३.
मकर (Capricorn Zodiac): अपेक्षित यश लाभणार
Weekly Horoscope : आपला राशिस्वामी शनी धनस्थानात आहे. लाभेश मंगळाची राशीवर दृष्टी आहे. शुभंकर गुरू पंचम या शुभ स्थानातून सुखावह ठरत आहे. चंद्र गुरूच्या साक्षीने या आठवड्यात शुभकारक भ्रमण सुरू करणार आहे. बव्हंशी अनुकूल असे हे ग्रहमान आहे. या सार्या ग्रहस्थितीची पुरेपूर फले आपणास निश्चितपणे लाभणार आहेत. लक्ष केंद्रित करून काही अपेक्षित परिणाम साधता येऊ शकतील. शुक्र रसिकता वाढविणारा आहे. कला, नाट्य क्षेत्रात असलेल्या मंडळींना उत्तम संधी मिळू शकतील. राजकारणातील मंडळींनाही शुभयोग यावेत.
शुभ दिनांक - १८, २०, २१, २२.
कुंभ (Aquarius Zodiac): प्रगतीच्या मार्गाने वाटचाल
आपला राशिस्वामी शनी स्वस्थानात असून योगकारक शुक्र लाभ स्थानात आहे. धनेश गुरू स्थानात आहे, तर चंद्रही सुख स्थानातून या आठवड्यातील भ्रमण सुरू करणार आहे. त्याचे हे भ्रमण अतिशय अनुकूल ठरणारे आहे. ही एकूण ग्रहस्थिती हा आठवडा प्रगतिशील असण्याचे द्योतक ठरणारी आहे. शिक्षण, संशोधन, क्रीडा, कला आणि न्याय क्षेत्रात कार्यरत असणार्यांना प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करता येऊ शकेल. व्यवसायात अनुभवी सल्ला, सहकार्यांची मदत, जिद्द यातून दीर्घकालीन यशाचा पल्ला गाठण्यासाठीचा प्रवास सुरू होऊ शकेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील.
शुभ दिनांक - १८, २०, २१, २२.
मीन (Pisces Zodiac): नोकरी-व्यवसायात तडजोड
Weekly Horoscope : राशिस्वामी गुरू पराक्रम स्थानात असून त्याची भाग्यावर व लाभावर दृष्टी आहे. तो अतिशय अनुकूल आहे. चंद्रही गुरूच्या साक्षीने या सप्ताहातील भ्रमण सुरू करीत आहे. दरम्यान, राशीत राहू आहे. तो काहीशी मानसिक संभ्रमात्मक स्थिती निर्माण करू शकतो. आपल्याभोवती अनावश्यक असे गोंधळाचे व गैरसमजाचे वातावरण निर्माण होऊ शकते. त्याच्या प्रभावाने काहींना आरोग्याची काळजी, मानसिक तणाव, काही गंभीर स्वरूपाच्या चुका यांची छाया या आठवड्यावर राहू शकेल. काहींना कार्यक्षेत्रात मोठी तडजोड स्वीकारावी लागेल. या सार्यातून आपणास सहीसलामत ठेवण्याची राशिस्वामी गुरू सांभाळीत राहील.
शुभ दिनांक - १७, १९, २१, २२.
- मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री, ८६००१०५७४६