ठाणे,
water taxi : वॉटर टॅक्सी सेवा सुरू झाल्यानंतर मुंबईच्या कोणत्याही कोपऱ्यातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रवास झटपट होईल. केवळ १७ मिनिटांत विमानतळावर जाता येईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे प्रचारसभेला संबोधित करताना सांगितले.
मुंबई आणि ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडवणे आणि जोडणीत परिवर्तन आणण्याची सरकारची योजना आहे, असे गडकरी म्हणाले. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्च २०२५ मध्ये कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. प्रस्तावित वॉटर टॅक्सी सेवा सुरू झाल्यावर मुंबईच्या कोणत्याही भागातून प्रवाशांना केवळ १७ मिनिटांत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचता येईल. या उपक्रमाचा भाग म्हणून विमानतळाच्या जवळ अगोदरच जेट्टी उभारण्याचे काम सुरू झाले आहे. मुंबई आणि ठाण्यातील विशाल सागरी मार्गांचा वापर करून आपण वाहतूक कोंडीची समस्या सोडवू शकतो तसेच वायूप्रदूषणावरही नियंत्रण ठेवू शकतो, असे गडकरी यांनी सांगितले. water taxi पारंपरिक धावपट्टीची गरज दूर करून ठाण्यातील तलावांसह लहान पाणथळ भागात उतरवण्यास सक्षम उभयचर सागरी विमाने आणण्याची क्षमताही गडकरी यांनी अधोरेखित केली. या प्रकल्पाचा विकास आणि अंमलबजावणीसाठी सरकार सक्रियपणे गुंतवणूकदार शोधत आहे. मुंबई आणि पुण्यातील रहदारीच्या समस्यांकडे लक्ष वेधताना गडकरी यांनी नवी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेचा संदर्भ दिला. तो पूर्णतः कार्यान्वित झाल्यानंतर बाहेरील वाहतूक वळवेल आणि मेट्रोपॉलिटन भागातील गर्दी कमी करेल, असे ते म्हणाले.